Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र प्रदेशाध्याक्ष बदलण्याच्या चर्चेला नाना पटोलेंचे उत्तर; म्हणाले, "मी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून..."

प्रदेशाध्याक्ष बदलण्याच्या चर्चेला नाना पटोलेंचे उत्तर; म्हणाले, “मी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून…”

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलला जाण्याची चर्चा सुरू आहे. तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याचे बोलले जात आहे. पण आता नाना पटोले यांनी स्वतः याबाबत मौन सोडलेले आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबतच्या चर्चांवर काही अंशी पडदा पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलला जाण्याची चर्चा सुरू आहे. तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काही दिवसांत नाना पटोले हे पदावरून पायउतार होणार असल्याचे बोलले जात होते. पण आता नाना पटोले यांनी स्वतः याबाबत मौन सोडलेले आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबतच्या चर्चांवर काही अंशी पडदा पडला आहे.

हेही वाचा – Sharad Pawar : राष्ट्रवादी सदैव कोळी बांधवांच्या पाठिशी; मच्छिमार महिलांचा NCP मध्ये प्रवेश

- Advertisement -

आज (ता. 29 मे) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोलेंनी त्यांच्या अध्यक्षपदाबाबत विधान केले. “तुमच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षांकडे तक्रारी गेल्या आहेत. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे,” याबाबत काय सांगाल? पत्रकाराच्या या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, “येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत मी महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करणार आहे. मी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असेन. त्यामुळे या सर्व गोष्टींवर आता पडदा पडला आहे.”

- Advertisement -

पुढे नाना पटोले म्हणाले की, “या सर्व गोष्टींना काँग्रेस पक्षात स्थान नाही. आम्ही सर्वजण सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कशा जिंकता येतील याच्या योजनांवर काम करत आहोत. तसेच मी प्रसारमाध्यमांचे आभार मानेन, कारण गेल्या काही दिवसात या चर्चांमुळे तुम्ही माझ्या नावाला खूप प्रसिद्धी दिली आहे. परंतु या बातम्यांमध्ये तथ्य नाही. या सगळ्या बातम्या केवळ सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत. कुठलाही नेता माध्यमांसमोर काहीही बोललेला नाही.”

नाना पटोले यांच्याविरोधात काँग्रेसमधील एका गटाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येत होते. तर काही दिवसांपूर्वी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला होता. ज्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद टाळण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून पक्षात मोठा फेरबदल करण्यात येऊ शकतो.

 

पण आज झालेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे प्रदेशाध्यक्ष पदाच्या वादावर तुर्तास तरी पूर्णविराम लागला आहे. त्यामुळे पुढील काही महिने नाना पटोले हेच प्रदेशाध्यक्ष पदावर राहणार आहेत. त्यामुळे आता पक्षातील नाराज नेते नेमके याबाबत भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -