घरदेश-विदेशमहागाईविरोधात काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन, राजभवनला घालणार घेराव

महागाईविरोधात काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन, राजभवनला घालणार घेराव

Subscribe

महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्नांवर काँग्रेस आज देशव्यापी आंदोलन करणार आहे. दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची चौकशी केल्यानंतर काँग्रेस केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहे. पावसाळी अधिवेशनातही काँग्रेसने सरकारला सातत्याने घेराव घालत आहे.

काँग्रेसचा राजभवनाला घेराव –

- Advertisement -

लष्कराची अग्निपथ योजना, वाढती महागाई, बेरोजगारी, वाढती जीएसटी आणि कंत्राटी पद्धतीच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेला सत्याग्रह जोपर्यंत सरकार कोणताही दिलासा देत नाही, तोपर्यंत सत्याग्रह सुरूच ठेवणार असल्याचे काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी म्हटले आहे. 5 ऑगस्ट रोजी काँग्रेस देशभरात याविरोधात आंदोलन करणार आहे.

दिल्लीतील राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाचाही घेराव काँग्रेस करणार आहे . काँग्रेस राज्यांमध्ये राजभवनाचा शांततेने घेराव करेल. यावेळी पोलिसांनी अटक केल्यास काँग्रेस नेते अटक करुन घेतील. लांबा म्हणाल्या की, वाढती महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरील चर्चेपासून केंद्रातील मोदी सरकार दोन आठवडे पळकाढत राहीले.

- Advertisement -

दिल्लीत पोलीस सतर्क –

आदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी  जंतर-मंतर वगळता नवी दिल्लीच्या संपूर्ण भागात कलम 144 लागू आहे. निषेधाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली वाहतूक पोलिसांनी लोकांना नवी दिल्लीतील अनेक मार्ग टाळण्याचा सल्ला दिला आहे. बस सेवा बंद केल्या जातील. दिल्ली वाहतूक पोलिसांचे नवी दिल्ली जिल्हा डीसीपी आलाप पटेल यांनी सांगितले की, काँग्रेस आणि युवक काँग्रेसने शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून आंदोलनाची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत वाहतूक सुरळीत होण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.

उन्होंने बताया कि बसों को धौला कुंआ, रिज रोड, शंकर रोड, पंचकुईया रोड, चेम्सफोर्ड रोड, मिंटो रोड, लोधी रोड, मथुरा रोड, डब्ल्यू पाइंट, अरविंदो मार्ग, अफ्रीका एवेन्यू आणि मोती बाग रोड लाइट(शांति पथ) पलीकडे जाऊ दिले जाणार नाही. आंदोलनामुळे कमल अतातुर्क मार्ग, कौटिल्य मार्ग, तीन मूर्ति मार्ग, राजाजी मार्ग, रायसीना मार्ग आणि सफदरजंग रोडवरील वाहतूकीवर परिणाम होईल.

याशिवाय सरदार पटेल मार्ग, शांति पथ, पंचशील मार्ग, तुगलक रोड, एपीजे अब्दुल कलाम रोड, पृथ्वीराज रोड, शाहजहां रोड, जाकिर हुसैन मार्ग, मौलाना आजाद रोड, रफी मार्ग, जनपथ रोड, अशोक रोड, राजेंद्र प्रसाद रोड, मदर टेरेसा क्रेसेंट मार्ग, बाबा खड़क सिंह मार्ग व मथुरा रोड़वर वाहतूक कोंडी होईल.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -