घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे टीकास्त्र

Subscribe

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे पर्यटन करून ५० खोक्यांच्या बदल्यात महाराष्ट्राच्या जनतेचा घात केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या समर्थक आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्यावर विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी जोरदार टीका केली. जनतेच्या पैशांवर मुख्यमंत्र्यांचे पर्यटन सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर शिंदे सरकारवर कामाख्या देवी कोपणार असून हे सरकार लवकरच गडगडेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात शिवसेनेत बंड करताना सूरत मुक्कामानंतर थेट गुवाहाटी गाठली होती. त्यावेळी त्यांच्या समर्थक आमदारांनी शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असा नवस गुवाहाटीतील कामाख्या देवीला केला होता. तो नवस पूर्ण झाल्याने स्वतः शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन आज गुवाहाटीत दाखल झाले. या दौऱ्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ताफा आलिशान सुविधांसह गुवाहाटीच्या कामाख्या देवीचा नवस फेडण्यास गेला. राज्यातील शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसला आहे. बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत सरकारकडे आशेने पाहत आहे आणि शिंदे सरकार मात्र सरकार वाचावे यासाठी देवदर्शनात व्यस्त आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे पर्यटन करून ५० खोक्यांच्या बदल्यात महाराष्ट्राच्या जनतेचा घात केला. आता ५० खोक्यांवरून तुमच्याच आमदारांमध्ये वाद जुंपल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. कधी गणशोत्सव मंडळांना भेटी देण्यात व्यस्त तर कधी नवरात्रोत्सवात व्यस्त, परत सरकार वाचेल का नाही ह्यासाठी ज्योतिष्याला हात दाखवण्याचा प्रकार यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ आहे, पण जनतेच्या प्रश्नांसाठी वेळ नाही. देवीचा नवस फेडा नाहीतर ज्योतिष्याला हात दाखवा. पण या असंवैधानिक सरकारचे भविष्य न्यायालयाच्या हातात आहे आणि तेथे कोणताही नवस किंवा भविष्य कामाला येत नसते, असा टोला लोंढे यांनी लगावला आहे.

- Advertisement -

दरम्यान शिंदे सरकारवर कामाख्या देवीचा कोप असल्याने हे सरकार लवकरच गडगडणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. येत्या २९ नोव्हेंबरला सत्तांतर वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार असून या निकालानंतर १६ आमदारांचे निलंबन होणार आहे. त्यात स्वतः एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे निलंबन झाल्यानंतर शिंदे सरकार गडगडणार आहे, असे तपासे म्हणाले.

शिंदे सरकारकडून बळीराजाला ताकद देण्याचे काम झाले नाही. शिवाय तरुणांना रोजगार देणारे राज्यातील प्रकल्प गुजरातला गेले. शिंदे यांनी गुजरातला सहकार्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच शिंदेंना यावेळी कामाख्या देवीचा आशीर्वाद नाही तर कोपाला सामोरे जावे लागणार असल्याचे महेश तपासे यांनी म्हटले आहे.


हे ही वाचा – एक दिवस सर्व आमदारांचा संयम सुटेल तेव्हा… उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केसरकरांची संतप्त प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -