Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रCongress : त्या शेतकऱ्याची आत्महत्या नव्हे तर युती सरकारने घेतलेला बळी, कॉंग्रेसचा हल्लाबोल

Congress : त्या शेतकऱ्याची आत्महत्या नव्हे तर युती सरकारने घेतलेला बळी, कॉंग्रेसचा हल्लाबोल

Subscribe

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी गुरुवारी (13 मार्च) सकाळी आत्महत्या केली. संपूर्ण राज्य या घटनेने हळहळले आहे. अशामध्ये आता विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त मूठभर उद्योगपती तसेच कंत्राटदारांचे आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला वीज, पाणी नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे. पण कुंभकर्णी झोपेतील सरकारला ते दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळचा तरुण शेतकरी कैलास नागरेनी केलेली आत्महत्या ही भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचे उदाहरण आहे.” असा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. (Congress on Farmer Suicide in Buldhana State president criticized government)

हेही वाचा : Manoj Jarange : सातत्याने मारहाणीचे व्हिडिओ का समोर येत आहेत? जरांगे-पाटलांनी सांगितले राजकारण 

“कैलास नागरेच्या आत्महत्येस भाजपा सरकारच जबाबदार असून हा सरकारी बळी आहे,” असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला. कैलास नागरे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, “कैलास नागरे यांच्या निधानाची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्याच्यांशी आपला अनेक वर्षांपासून स्नेह होता. नागरे हे प्रगतीशील शेतकरी आणि सामाजिक जाणिव असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी शेतीमध्ये अनेक चांगले प्रयोग केले होते मी माझ्या मुलाला तुझी शेती पहायला पाठवतो असे त्यांना सांगितले होते. माझ्या मुलाला आदर्श म्हणून दाखवलेला माणूस अशा प्रकारे आपल्यातून निघून जातो हे अत्यंत वेदनादायी आहे.” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याला होळीच्या सणाच्या दिवशी विषारी औषध पिऊन जीवन संपवावे लागले ही महाराष्ट्राला लाज आणणारी बाब आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे पण त्याच्या ताटातच अन्न नसेल तर तो आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरेल. कैलास नागरे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी तीन पानाची नोट लिहून शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला आहे. कैलाश नागरे यांनी खडकपूर्णाच्या डाव्या कालव्यातून शेतक-यांना पाणी द्यावे म्हणून डिसेंबर महिन्यात सात दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते पण तीन महिने उलटूनही पाणी मिळत नसल्याने नागरे निराश झाले होते आणि त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.” असे ते यावेळी म्हणाले.