घरताज्या घडामोडीकाँग्रेस पक्ष त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर - संजय राऊत

काँग्रेस पक्ष त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर – संजय राऊत

Subscribe

काँग्रेस पक्ष देशातला जुना पक्ष आहे. गेले कित्येक वर्ष काँग्रेसने देशाच्या राजकारणात, अनेक प्रकारच्या संघर्षात आणि चळवळीमध्ये काढली. त्या पक्षाने स्वतः अस्तित्व टिकवू ठेवण्यासाठी सत्तेत असताना सत्तेत आणि सत्तेत नसताना विरोधी पक्ष म्हणून उभे राहिला पाहिजे. दुर्दैवाने आज ती स्थिती दिसत नाही आहे. काँग्रेस पक्ष हा त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर झालेला दिसत आहे आणि त्याची मला वेदना आहे. देशाच्या राजकारणामध्ये प्रमुख पक्ष टिकला पाहिजे. तरच या देशांची संसदीय लोकशाही टिकू शकते, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत काँग्रेसच्या अध्यपदावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलत असताना म्हणाले.

काँग्रेस पक्ष जास्त खिळखिळा होत चालला आहे का?

पुढे राऊत म्हणाले की, ‘मधल्या काळात २३ प्रमुखांनी सोनिया गांधींना पत्र पाठवले होते. त्या पत्रावरून जे काही वादळ निर्माण झाले आहे. ते काही क्षमलेले नाही आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष जास्त खिळखिळा होत चालला आहे का अशी माझ्या मनात भिती वाटते आहे. म्हणून मला असे वाटते की, राहुल गांधी त्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी हे वादळ क्षमवायला पाहिजे. २३ नेत्यांनी केलेली मागणी ही चुकीची नाही आहे. काँग्रेस पक्षाला कायम स्वरुपी सक्रीय नेतृत्वाची गरज आहे. पण नेतृत्व कोणाचे आहे हे सांगण्यास ते तयार नाही आहेत. नेतृत्व करायला त्या तोडीची व्यक्ती पाहिजे. आजही काँग्रेस पक्षाला गांधी कुटुंबाशिवाय पर्याय नाही, ही लोकभावना आहे आणि ते सत्य सुद्धा आहे. हा विषय काँग्रेस पक्षाचा अंतर्गत असला तरी तो अंतर्गत विषय देशाच्या राजकारणाशी संबंधित आहे. म्हणून मी मत व्यक्त केले.’

- Advertisement -

आज देशाला एका मजबूत विरोधी पक्षाची गरज

ज्या काँग्रेस पक्षाच वैभव आम्ही पाहत आलो आहोत. ती स्थिती आता काँग्रेस पक्षाची नाही आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला पुन्हा ते वैभव प्राप्त करून देण्यासाठी पक्षातील लोकांनी एकत्र आले पाहिजे. मग ती गांधी परिवारातील असतील किंवा बाहेरील, सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. किंबहुना जे काँग्रेस पक्ष सोडून गेले आहेत त्यांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू करणे गरजेचे आहे. अनेक प्रमुख नेते काँग्रेस पक्षातून का बाहेर पडले. ममता बॅनर्जी या मुळच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वतःच्या पक्षाची स्थापना केली. तसेच शरद पवारांनी देखील महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षाची स्थापना केली. अशी बरीच उदाहरणे आहेत. आज या देशाला एका मजबूत विरोधी पक्षाची गरज असून मुख्य प्रवाहातून आज विरोधी पक्ष मला दूर जाताना दिसत आहे. हे देशाच्या संसदीय लोकशाहीसाठी योग्य नाही आहे. जसे महाराष्ट्रामध्ये आम्ही सत्तेत असलो तरी आमच्या समोर प्रबळ विरोधी पक्ष आहे. ज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत. लोकशाहीत असे प्रबळ विरोधी पक्ष आणि नेतृत्व असणे हे सत्ताधाऱ्यांना कायम काम करण्याची प्रेरणा देत असते, असे देखील राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -