घरदेश-विदेशशिवसेनेनं आधी यूपीएत यावं, मग अध्यक्षपदावर बोलावं - काँग्रेस

शिवसेनेनं आधी यूपीएत यावं, मग अध्यक्षपदावर बोलावं – काँग्रेस

Subscribe

संजय राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष बनवण्याच्या मागणीचा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुनरुच्चार केला. यावर आता काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेनं आधी यूपीएत यावं, मग अध्यक्षपदावर बोलावं, असा सल्ला शिवसेनेला दिला आहे. तर सचिन राऊत यांचं यूपीए अध्यक्षाबाबतचं विधान हास्यास्पद आहे, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी व्यक्त केलं.

युपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज युपीए (UPA – United Progressive Alliance) अत्यंत विकलांग अवस्थेत आहे. युपीएची ताकद कमी झाली असून युपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं, असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले. यावर काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शिवसेना हा यूपीएचा घटक नाही. त्यांनी यूपीएमध्ये सामिल व्हावं. त्यानंतर तुम्हाला बोलण्याचे काही अधिकार असतील, असं सचिन सावंत म्हणाले. सातत्याने काहीतरी लिहावं लागतं, म्हणून ते सातत्याने मागण्या करत बसतात. एकदा सांगून देखील त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, असं म्हणत सचिन सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

राऊतांचं विधान हास्यास्पद – हुसैन दलवाई

संजय राऊत यांचं विधान हास्यास्पद आहे. हास्यास्पद विधानं करण्याची राऊतांना सवय झाली आहे. काहीही बोलतात आणि बऱ्याच वेळा गोत्यात येतात. शिवसेना यूपीएत नाही, मग यूपीएचा अध्यक्ष कोण होणार हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी केलं. राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. विनाकारण वक्तव्य करत राऊतांनी वाद निर्माण करु नये, असा सल्ला देखील त्यांनी दिला.


हेही वाचा – ‘फडणवीस मोदींपेक्षा मोठे नेते, मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा उंच’; राऊतांचा टोला

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -