घरताज्या घडामोडीकेंद्रातले ६० टक्के मंत्री डागाळलेले, म्हणूनच मौनव्रत आंदोलन - नाना पटोले

केंद्रातले ६० टक्के मंत्री डागाळलेले, म्हणूनच मौनव्रत आंदोलन – नाना पटोले

Subscribe

कॉंग्रेस सरकार हे गांधी विचारांचे सरकार आहे. त्यामुळे केंद्रात बसलेल्या सरकारपर्यंत आता गांधी विचार पोहचवण्याची वेळ आली आहे. ज्या केंद्र सरकारमध्ये खूनी, स्मगलर आणि तडीपार लोक बसले आहेत, ते देशाला संपवायला निघाले आहेत. त्यामुळे अशा केंद्रातील लोकांना गांधी विचारांची सध्या गरज आहे, असे मत महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. राजभवनाबाहेर कॉंग्रेसकडून आज मौनव्रत आंदोलन करण्यात आले. गांधी विचार त्यांच्यापर्यंत पोहचवून त्याची जाणीव करून द्यायची आहे. केंद्रात मोठ्या प्रमाणात जे ६० टक्के दोषी मंत्री आहेत, मिश्रा हे एकमेव मंत्री नाहीत, अशा सगळ्या डागाळलेल्या मंत्र्यांना पदावरून काढले पाहिजे, तेव्हाच देश सुरक्षित राहू शकतो. शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना चिरडायची भाजपची भूमिका आहे. त्यामुळे मौनव्रताच्या माध्यमातून संदेश देण्याचे काम आम्ही केले आहे. केंद्रातील भाजपचे सरकार या आंदोलनानंतर तरी जागे होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. कॉंग्रेसकडून यावेळी राजभवनात एक निवेदनही देण्यात आले.

फडणवीसांनी केंद्रातून मदत आणावी 

देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागात दौरे करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून दुजाभाव होत आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नाना पटोले म्हणाले. केंद्राने फक्त नाममात्र पैसे देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे फडणवीसांनी केंद्र सरकारमध्ये जाऊन राज्यातील सरकारला मदत करण्याची गरज आहे. यातूनच फडणवीस यांचा ढोंगीपणा सरकारला दिसतो आहे.

- Advertisement -

मावळच्या घटनेचाही कॉंग्रेसनेही मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. या घटनेनंतर राहुल गांधी हे स्वतः त्याठिकाणी आले होते. आमचे पोटात वेगळ आणि ओठात वेगळे अशी भूमिका नाही. आमच्या नेत्या प्रियंका गांधी किडनॅप केले, त्यामुळे केंद्राची महिलांसाठीची भूमिका दिसत आहे. महिलांचा, शेतकऱ्यांचा, छोट्या व्यापाऱ्यांचा विरोध करणारे आणि संपवणारे, असे हे सरकार आहे. या आंदोलनात शेतकरी, व्यापारी संबंध वर्गाने सहभाग दाखवत हे महाराष्ट्र बंद आंदोलन यशस्वी केल्याचेही ते म्हणाले.


हेही वाचा – Maharashtra Bandh : केंद्रीय मंत्री अजय मिश्रांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – नाना पटोले

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -