घरताज्या घडामोडीगांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न, ईडी सरकार आमचा आवाज दाबतेय; नाना पटोलेंचा...

गांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न, ईडी सरकार आमचा आवाज दाबतेय; नाना पटोलेंचा भाजपला टोला

Subscribe

गांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. तसेच, ईडी सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कॉग्रेसे प्रदेशाधअय नाना पटोले यांनी केला. देशभरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्य महागाईने उचांक गाठला आहे.

‘गांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. तसेच, ईडी सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कॉग्रेसे प्रदेशाधअय नाना पटोले यांनी केला. देशभरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्य महागाईने उचांक गाठला आहे. सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर कॉग्रेसने आज महागाई (Inflation) आणि बेरोजगारीविरोधात (Unemployment) देशव्यापी आंदोलन केले. महाराष्ट्रातही काँग्रेसचं आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी काँग्रेसच्या अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. (congress protest nana patole slam bjp mumbai)

या आंदोलनानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी पत्राकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप, नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिक स्पष्ट केली. यावेळी पत्रकारांशी बातचित करतान कॉंग्रसेच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल केला.

- Advertisement -

“आज आंदोलनावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी फरफडत नेले. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. मात्र तरीही पोलिसांनी ताब्यात घेतले. गांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न सातत्याने होतो आहे. त्यामुळे लोकशाही वाचवणे हा आमचा धर्म असून आम्ही ते करत राहणार आहोत”, असे नाना पटोले यांनी म्हटले.

“कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात आंदोलन करण्यात आले. आम्ही अमची मीटिंग विधान भवनात करत होतो. त्यावेळी पोलीसांनी ताब्यात घेतले. एकट्या मुंबईत 10 हजारापेक्षा जास्त लोकांना पोलीसांनी ताब्यात घेतले. निर्मला सीतारामन म्हणतात देशात सगळे ठीक आहे. परिस्थिती वेगळी आहे. जनतेची लढाई आम्ही लढत राहणार आहोत”, असे नाना पटोले यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – मविआच्या स्थापनेनंतरही युतीची चर्चा सुरू होती, पण राणेंमुळे मोडता; केसरकरांचा गौप्यस्फोट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -