घरताज्या घडामोडीनिवडणूक का झाली नाही?, नड्डांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवल्यानंतर काँग्रेसचा भाजपला सवाल

निवडणूक का झाली नाही?, नड्डांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवल्यानंतर काँग्रेसचा भाजपला सवाल

Subscribe

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. जून 2024 पर्यंत नड्डाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. राष्ट्रीय कार्यकारिणीसमोर आज जेपी नड्डा यांच्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला. जो भाजपच्या सर्व सदस्यांनी मान्य केला. त्यामुळे भाजप अध्यक्ष म्हणून जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान, निवडणूक का झाली नाही?, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपसमोर प्रश्न उपस्थित केला आहे. जे.पी. नड्डा यांचं अध्यक्षपद वाढवण्यात आलं. काँग्रेसला सतत प्रश्न विचारणाऱ्या भाजपाला माझा एक प्रश्न आहे की, निवडणूक का झाली नाही?, असं ट्विट करत सचिन सावंत यांनी भाजपला डीवचलं आहे.

- Advertisement -

पुढील वर्षी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशातील जनतेकडून जनमत मागणार आहेत. यापूर्वी 2023 मध्ये 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुकांबाबत राजकीय समज निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामध्ये विशेषत: मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये पक्षाची कामगिरी लोकसभेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे या राज्यांमध्ये भाजपच्या सध्या 93 पैकी 87 जागा आहेत.

- Advertisement -

जेपी नड्डा यांच्यासोबत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली 2024 च्या लोकसभा निवडणुका अधिक चांगल्या पद्धतीने पार पडतील यावर अमित शहा यांनी भर दिला. 2019 पेक्षा जास्त जागा जिंकल्या जातील. जेपी नड्डा यांनी अमित शाह यांच्याकडून पक्षाची कमान हाती घेतली होती.


हेही वाचा : जेपी नड्डांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवला; लोकसभा निवडणुकीचं करणार नेतृत्व


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -