Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रCongress : मविआलाच बहुमत मिळणार, मुख्यमंत्रीपदावर वाद नाही - चेन्नीथला

Congress : मविआलाच बहुमत मिळणार, मुख्यमंत्रीपदावर वाद नाही – चेन्नीथला

Subscribe

मुंबई : राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा शनिवारी (23 नोव्हेंबर) लागणार आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांकडून विजयाचा दावा केला जात आहे. अशामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी राज्यात काँग्रेससह महाविकास आघाडी स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दलही स्पष्ट बाजू मांडली. (Congress Ramesh Chennithala on Maharashtra Election 2024 Result and MVA win)

हेही वाचा : Congress : मी सत्तेतला आमदार असणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा; आघाडीचा आकडाही सांगितला 

- Advertisement -

मुंबईतील टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळणार हे निश्चित आहे. स्पष्ट बहुमतासह काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार आहेत.” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रामधील जनता काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. विधानसभेला जास्त मतदान झाल्याचा फायदाही काँग्रेस महाविकास आघाडीलाच होणार आहे.” असा दावा त्यांनी यावेळी केला.

अनेक एक्झिट पोलनुसार, राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. यावर ते म्हणाले की, महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत असून त्रिशंकु विधानसभेचा प्रश्न उद्भवत नसल्याचे म्हंटले. निवडून आलेल्या आमदारांना काँग्रेस पक्षाने हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे का? असा प्रश्न विचारला गेला असता ते म्हणाले की, काँग्रेसचे आमदार कठीण परिस्थितीमध्येही पक्षासोबत राहिले असल्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, “मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नसून निकालानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील.” असे त्यांनी स्पष्ट सांगितले.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -