Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ऑक्सिजन प्रकल्पासाठी केंद्रामार्फत निधीच नाही, कॉंग्रेसने फेटाळले भाजपचे आरोप

ऑक्सिजन प्रकल्पासाठी केंद्रामार्फत निधीच नाही, कॉंग्रेसने फेटाळले भाजपचे आरोप

केंद्र सरकारने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी कोणताही निधी दिला नाही.

Related Story

- Advertisement -

देशात १० ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम केअर फंडमधून निधी उपलब्ध करुन दिला होता. परंतु गेल्या ४ महिन्यांमध्ये राज्य सरकारने एकही प्लांट उभारला नाही. हे पैसे राज्य सरकारने गायब केले असा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला होता. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पलटवार केला आहे. भाजप जगातील सर्वात मोठा खोटारडा पक्ष आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी कोणताही निधी दिला नाही. तसेच हा प्रकल्प कार्यान्वयित करण्यासाठी एजन्सी मोदी सरकारने ठरवली होती. तसेच ५ एप्रिल २०२१ नंतर मशीन पुरवत आहे तर सिंधुदुर्गला अजून दिली नाही असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागत आहे. केंद्र सरकारने राज्याला १० ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी केंद्राने निधी दिला असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. यानंतर काँग्रेसकडून हा आरोप फेटाळला आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्राकडून निधी मिळाला नसल्याचे जाहीर केले आहे. सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने स्वतः एजन्सी राज्यात पाठवली होती. केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या एजन्सीचे इंजिनिअर इन्स्टॉलेशन करत आहेत. असे असताना पत्रकार परिषद घेऊन भाजप खोटारडे आरोप करत आहेत. देशात घोषित केलेल्या १६२ ऑक्सिजन प्रकल्पांपैकी केवळ ३३ प्रकल्प झाले आहेत. त्यामध्ये आथा ५५१ नवीन प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. आता हे प्रकल्प कधी चालू होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच जाणे असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

भाजपने काय केला होता आरोप

महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून निधी देण्यात आला होता. मात्र आघाडी सरकारने या निधीचा विनियोगच केला नाही. केंद्राने दिलेला निधी आणि मुख्यमंत्री निधीतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे केले असते तर राज्यात ऑक्सिजन आभावी अनेकांचा बळी गेला नसता. केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले याचा आघाडी सरकारने हिशोब द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली.

- Advertisement -