घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023खासदारकी गेल्यानंतरही काँग्रेस म्हणते राहुल गांधी पंतप्रधान बनणार; इंदिराजींनाही...,

खासदारकी गेल्यानंतरही काँग्रेस म्हणते राहुल गांधी पंतप्रधान बनणार; इंदिराजींनाही…,

Subscribe

Congress Leaders Reactions | अंतिम आठवडा सादर होताच विरोधी पक्षाने सभात्याग करत बाहेर पायऱ्यांवर मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. असं असतानाच राहुल गांधी लवकरच पंतप्रधान बनणार असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. 

Congress Leaders Reactions | मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाने कारवाई केली आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली असल्याने लोकसभा सचिवालयाने त्यांचं संसदीय सदस्यत्व रद्द केलं आहे. यावरून मुंबईत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षनेते आक्रमक झाले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करत असतानाच राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याची माहिती आली. त्यामुळे अंतिम आठवडा सादर होताच विरोधी पक्षाने सभात्याग करत बाहेर पायऱ्यांवर मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. असं असतानाच राहुल गांधी लवकरच पंतप्रधान बनणार असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Breaking News : राहुल गांधींची खासदारकी रद्द; मोदी आडनावाचे प्रकरण भोवले

- Advertisement -

राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलं हा लोकशाहीवरील हल्ला आहे. भारत जोडो यात्रेनंतर भाजपा राहुल गांधींना आणखी घाबरायला लागलं हे सिद्ध करणारं हा निर्णय आहे. इंदिराजींनीही या व्यवस्थेला तोंड दिलं होतं. राहुलजी सुद्धा या दडपशाहीला घाबरणार नाहीत. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झालेले दिसतील. भारत जोडोनंतर देशात चित्र बदललं. भाजपाला याची भीती वाटते आहे. त्यांनीच लोकशाहीतून दडपशाही आणि हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू केली आहे. लोकशाहीसाठी नव्या स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

कोण काय काय म्हणाले?

आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू करू – नाना पटोले

- Advertisement -

लोकशाही व्यवस्थेच्या विरोधातील हा निर्णय आहे. गेल्या नऊ वर्षांत नरेंद्र मोदींचं सरकार आपल्या मित्रोंसाठी ललित मोदी, विजय मल्ल्या, नीरव मोदी अशा लोकांनी लाखो हजारो कोटी रुपये घेऊन पळालेत, त्यांना सहकार्य करण्याचं काम मोदी सरकार करत आहे. त्याविरोधात राहुल गांधी आवाज उठवत आहेत. लोकसभेत त्यांना बोलू दिलं जात नाही. रस्त्यावर बोलले की त्यांनी अडवलं जातं. जिल्हा न्यायालयाचा एक निर्णय गेऊन राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द करण्याचं पाप ठरवून केलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू करू. इंग्रजाप्रमाणे लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून ईडी, सीबीआयची चौकशी लावून त्याला दबावात ठेवलं जात आहे. देशाची तिजोरी लुटली, बँक लुटली अशा भूमिका मांडणाऱ्या राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द केल. त्यामुळे आम्ही मोदी सरकारचा धिक्कार करतो.


भारत जोडोमुळे राहुल गांधींची लोकप्रियता वाढली – पृथ्वीराज चव्हाण

अघोषित आणीबाणी आणायचा प्रयत्न सुरू आहे. राहुल गांधींना जो देशात प्रतिसाद मिळतो आहे. नरेंद्र मोदींची अप्रियता वाढायला लागली आहे. महागाई, बेरोजगारी रोखण्यास नरेंद्र मोदी अपयशी ठरत आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींची लोकप्रियता वाढू लागल्याने ही कारवाई झाली आहे. एका बाजूला शिक्षा करून दोन वर्षे तुरुंगात डांबायचं आणि दुसऱ्या बाजुला त्यांची खासदारकी रद्द करायची. राहुल गांधींचा आवाज बंद करण्याचा हा दुष्ट प्रयत्न. सूडभावनेने केलेली कारवाई आहे.


देशाच्या परंपरेला तिलांजली – अजित पवार

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदाराची खासदारकी रद्द केली गेली. वैचारिक मतभेद असू शकतात. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत कुणाची खासदारकी रद्द केल्याचं मलातरी काही आठवत नाही. हे लोकशाहीत बसत नाही. आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. आज ज्याप्रकारचा निर्णय लोकसभेने घेतला आहे. तो निर्णय लोकशाहीला धक्का देणारा आहे. याचा आम्ही धिक्कार करतो. जनता हे सगळं बघतेय. कोणीही राज्यकर्त्यांनी राज्यकर्ते असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचं असतं ही आपल्या देशाची परंपरा आणि पद्धत आहे. परंतु, त्यालाच तिलांजली देण्याचं काम दिलं आहे. इंदिराजींच्या बाबतीही तेव्हाचं सरकार वागलं होतं. १९७७ साली ज्यांना पराभूत केलं होतं त्याच इंद्राजींना १९८० साली प्रचंड बहुमताने भारताच्या जनतेने लोकशाहीच्या पद्धतीने मतदानाने केलं आहे.


लोकशाहीचे हत्याकांड- उद्धव ठाकरे

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे. चोर देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहुल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. लढत राहू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -