अपयश झाकण्यासाठी CM नाही PM बदला, काँग्रेसचा भाजपवर निशाणा

गुजरातमध्ये काही महिन्यांवर निवडणुका असताना विजय रुपाणी यांना हटवून भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केलं

allahabad hc urges pm modi and ec to postpone UP election in view of corona threat omicron
विधानसभा निवडणुका पुढे ढकला, रॅली थांबवा; उच्च न्यायालयाचे PM मोदी अन् निवडणुक आयुक्तांना आवाहन

विजय रुपाणी यांनी गुजरात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा करुन भाजपने धक्काच दिला आहे. पटेल यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी जाणे हे अनपेक्षित होते. भाजपने गेल्या ६ महिन्यांमध्ये पाच राज्याचे मुख्यमंत्री बदलले आहेत. उत्तराखंड, कर्नाटक, गुजरातमध्ये भाजपकडून डॅमेज कंट्रोल करण्यात आला आहे. यावरुन काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान बदला असा टोला काँग्रेसने लगावला असून ट्विटरवर #CM_नहीं_PM_बदलो अशी मोहिम सुरु केली आहे.

भाजपशासित ६ राज्यांना नवे मुख्यमंत्री मिळाले आहेत. कोरोना काळात या ६ राज्यांमधील कामगिरी निराशाजनक असून नेते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. भाजप या राज्यांमध्ये अपयशी राहिली असून हे अपयश झाकले जाणार नाही असा टोला काँग्रेसनं लगावला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात दौरा केला होता या दौऱ्यानंतर विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये कोरोना मृतांचे आकडे लपवले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. उत्तराखंड, कर्नाटक आणि आसामधील मुख्यमंत्री बदलले आहेत.

केंद्रातील मोदी सरकार कोरोना काळात आलेलं अपयश कधी स्वीकारणार? आपल्या देशातील लोकांचे लसीकरण करुन कोरोनावर मात करणे सोपे असताना पंतप्रधान मोदींनी लस परदेशात पाठवल्या आहेत. लसीकरणाच्या आकडेवारीमध्ये भारत फार मागे असल्याचेही काँग्रेसनं दाखवलं आहे. आपलं अपयश दुसऱ्याला द्यायचं आणि श्रेय स्वतः घ्यायचं हाच पंतप्रधान मोदींचा मंत्र असल्याचेही काँग्रेसनं म्हटलं आहे.

भाजपकडून या मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी

उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांना हटवून तिरथसिंह रावत यांची मुख्यमंत्री म्हणून निवड
तिरथसिंह रावत कायदेशीर अडचणीत सापडल्याने ११४ दिवसांत मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले
आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांना हटवून हेमंत बिश्वा सरमा यांना मुख्यमंत्री केलं
कर्नाटकमध्ये बीएस येडियुरप्पा यांना हटवून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केलं
गुजरातमध्ये काही महिन्यांवर निवडणुका असताना विजय रुपाणी यांना हटवून भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केलं