घरमहाराष्ट्रनसरुद्दीन शहांच्या 'त्या' वक्तव्याला काँग्रेसचे समर्थन

नसरुद्दीन शहांच्या ‘त्या’ वक्तव्याला काँग्रेसचे समर्थन

Subscribe

संघ परिवारातील संघटना आणि व्यक्तींनी दिलेल्या प्रतिक्रिया या अभिनेते नसरुद्दीन शहा यांचं म्हणणं खरं असल्याचे सिद्ध होत आहे, असेही रत्नाकर महाजन म्हणाले आहेत.

उत्तरप्रदेशातील बुलंद शहरामध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील अभिनेते नसरुद्दीन शहा, यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्यं केलं होतं. देशात गायीच्या मृत्यूचे महत्त्व पोलिसाच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे, असे म्हणत खंत व्यक्त केली होती. दरम्यान, शाह यांनी केलेल्या या विधानाचे काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी समर्थन केले आहे. त्यासोबतच संघ परिवारातील संघटना आणि व्यक्तींनी दिलेल्या प्रतिक्रिया या अभिनेते नसरुद्दीन शहा यांचं म्हणणं खरं असल्याचे सिद्ध होत आहे, असेही रत्नाकर महाजन म्हणाले आहेत. आज ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उत्तर प्रदेशातील बुलंद शहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीसस अधिकाऱ्याची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घटली होती. याप्रकरणी आपले मत मांडताना नसरुद्दीन शाह यांनी, ‘देशातील हे वातावरण पाहता मला माझ्या मुलाची चिंता वाटते, कारण त्यांचा कोणता धर्म नाही’, असे वक्तव्यही केले होते.

आज याच मुद्द्यावर बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते रत्नकर महाजन यांनी आपली ठाम भूमिका मांडली. कार्यक्रमादरम्यान महाजन म्हणाले की, संघ परिवारातील संघटना आणि व्यक्तींनी शहा यांच्या वक्तव्यावर ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्याच्यावरून अभिनेते नसरुद्दीन शहा यांचं म्हणणे खर आहे हे सिद्ध होते आहे. पुढे ते म्हणाले की,अजमेर येथे होणाऱ्या फेस्टिव्हल ला शहा हे जाणार आहेत त्यामुळे तिथल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यानी गोंधळ,राडा,मारामारी केली असून नसरुद्दीन शहा असलेल्या पोश्टरला काळे फासले तसेच ते फाडले देखील.असे प्रकार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केले. यावरूनच नसरुद्दीन शहा यांच्या म्हणण्याचं समर्थन केल्याचं सिद्ध केलं आहे, असे रत्नाकर महाजन म्हणाले आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले होते शाह?

बुलंद शहरातील हिंसाचार प्रकरणावर आपलं मत नोंदवताना नसरुद्दीन शाह म्हणाले होते, समाजात विष पसरल्यानं आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते आहे. आता गाईचा जीव माणसांपेक्षा महत्त्वाचा झाला आहे, असंगी ते म्हणाले होते. या वक्तव्यांवरून त्यांनी भारतातील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. या महिन्यातील ३ डिसेंबरला बुलंदशहरात गोहत्येवरुन तणाव निर्माण झाला. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं हल्ला केला. यामध्ये पोलीस निरीक्षकासह एका तरुणाचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -