घरमहाराष्ट्र'भाजप - शिवसेना म्हणजे ‘वरून तमाशा, आतून कीर्तन’!

‘भाजप – शिवसेना म्हणजे ‘वरून तमाशा, आतून कीर्तन’!

Subscribe

काँग्रेसच्या जनसंघर्ष रॅलीच्या चौथ्या टप्प्याच्या सांगता सभेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर कठोर टीका केली.

मागील ४ वर्षात भाजप आणि शिवसेनेने महाराष्ट्राची केवळ फसवणूक केली आहे. विकासाच्या नावाखाली राज्याची दिशाभूल होत असून, त्यांची भांडणेसुद्धा दिखाऊ आहेत. सत्तेतील दोन्ही पक्ष आपसात कितीही भांडत असले तरी त्यांची भूमिका ‘आपण दोघे भाऊ, मिळून-मिळून खाऊ’ अशीच आहे. त्यांची भांडणे म्हणजे ‘वरून तमाशा, आतून कीर्तन’असल्याची’, बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेंतर्गत अमरावती विभागातील चौथ्या टप्प्याचा चिखलीमध्ये रविवारी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते.

आपलं सरकार आणि घोषणा दमदार!

‘हे सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे. ‘आपलं सरकार’ या भाजप-शिवसेना सरकारच्या घोषणेचा धागा धरून ‘आपलं सरकार, घोषणा दमदार’ असाच या सरकारचा कारभार असल्याचं चव्हाण पुढे म्हणाले. ‘या सरकारला ‘फसणवीस’ सरकारच म्हटले पाहिजे. सरकारकडे नियोजन नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसा शिल्लक राहिलेला नाही. म्हणूनच अजूनही कर्जमाफी पूर्ण झालेली नाही. हे महाराष्ट्रासाठी दळभद्री ठरलेले सरकार आहे’, अशी परखड टीका त्यांनी केली. ‘गेल्या निवडणुकीत भाजपला केवळ ३० टक्के मतं मिळाली. पण उर्वरित ७० टक्के धर्मनिरपेक्ष मतांचं मोठं विभाजन झाल्याने भाजप सत्तेत आली’, असा दावा देखील त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

हेही वाचा – सहा महिन्यात काँग्रेसचे सरकार; अशोक चव्हाण यांचा आशावाद

हे सरकार हीच एक समस्या – विखे पाटील

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही यावेळी बोलताना सरकारला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले की, ‘लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार नावाची यंत्रणा असते. पण सध्या हे सरकारच लोकांसाठी एक मोठी समस्या ठरली आहे. मागील ४ वर्षांत या सरकारने लोकांची कामं करण्याऐवजी दडपशाहीच केली. या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येऊ नये, म्हणून विरोधी पक्षांवर तपास यंत्रणांमार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारविरोधात बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांची देखील मुस्कटदाबी सुरू आहे’, असं ते म्हणाले. तसेच, ‘शिवसेनेची अयोध्यावारी म्हणजे नौटंकी आहे. सरकार म्हणून आपले अपयश लपवण्यासाठीच त्यांना रामानामाचा जप सुरू’ केल्याची टीकाही विखे पाटील यांनी केली.


तुम्ही हे वाचलंत का? – काँग्रेसच्या चुका सुधारण्याचे काम करतोय -पंतप्रधान
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -