घरदेश-विदेशनिरपराधांवर ईडी, केंद्रीय तपास यंत्रणेचा दबाव आणून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न - नाना...

निरपराधांवर ईडी, केंद्रीय तपास यंत्रणेचा दबाव आणून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न – नाना पटोले

Subscribe

अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्त केली. याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईचाही मुद्दा त्यांच्यासमोर मांडला. शरद पवार आणि मोदी यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्त केली. याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईचाही मुद्दा त्यांच्यासमोर मांडला. शरद पवार आणि मोदी यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता या भेटीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निरपराध लोकांवर ईडीचा आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा दबाव आणून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपा सरकारनं सुरू केलेला आहे हे सांगण्यासाठी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचं पटोले यांनी सांगितलं.

“केंद्राच्या अत्याचारी व्यवस्थेची जाणीव करून देण्यासाठी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. निरपराध लोकांवर ईडीचा आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा दबाव आणून ब्लकमेलिंग करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपा सरकारनं सुरू केलेला आहे, याबाबत नरेद्र मोदींना कळवण्यासाठी शरद पवारांनी त्यांची काल भेट घेतली. केंद्राच्या जुलमी आणि अघोषित आणीबाणी संदर्भात ते पंतप्रधानांना सांगण्यासाठी गेले होते”, असं नाना पटोले यांनी म्हटलं.

- Advertisement -

“भाजपाच्या नेत्यांवर जो टीका करेल त्याच्यावर ही ईडी लावली जाते . महागाई बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर केंद्राचा सरकार फेल झालेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अत्याचाराच्या विरोधात विरोधात इंग्रजांच्या काळाप्रमाणे रस्त्यावर उतरण्याची गरज आहे आणि जर संजय राऊत असे करत असतील आणि त्यासाठी त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत असेल तर त्यात वावगे काय”

“शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. केंद्रातली सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय विरोधका विरोधात गैरवापर करत आहे. हे गाऱ्हाणं सांगायला शरद पवार पंतप्रधानांना भेटले. पंतप्रधान कुठल्या पक्षाचा नसतो असे आम्ही समजतो. पवारांनी पंतप्रधानांकडे संजय राऊत संदर्भातली परिस्थितीही सांगितली आहे. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र मध्ये धार्मिक दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरू झाला होता आता काही राजकीय पक्ष मशिदीवरील भोंगे काढावे असा फतवा काढत आहेत आणि राज्याचे भाजपचे नेते त्याला पाठिंबा देत आहेत म्हणजेच भाजपचे नेते जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न आहेत महाराष्ट्राची जनता अशा प्रयत्नांना कधीही पाठिंबा देणार नाही जनता समजूतदार आहे”

- Advertisement -

“सेव विक्रांत या नावाने पैसे गोळा केले आणि ते राज्यपालांकडे दिल्याचे सांगितले. मात्र राजभवन म्हणते कोणतेही पैसे मिळाले नाही. हे जनतेच्या पैशाची लूट आहे. आणि हे सर्व रेकॉर्ड वर आहे. आम्ही रेकॉर्ड नसलेल्या गोष्टी त्यांच्यासारखं करत नाही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनीही एका कार्यक्रमात उल्लेख केलेला आहे, की ईडी आणि सीबीआयचा वापर चुकीच्या पद्धतीने होत आहे, राजकीय उद्दिष्टाने होत आहे. पण इथेच राहू राजकीय व्यवस्था बदलत राहते असे ते म्हणाले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आता या गोष्टींचा सुमोटो विचार करावा अशी आमची मागणी होती”, असंही यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं.

काय म्हणाले शरद पवार पत्रकार परिषदेत?

‘राज्यसभेतील सहकारी संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईचाही मुद्दा त्यांच्यासमोर मांडला. राऊत यांच्यावरील कारवाई अन्यायकारक असून त्यांची मालमत्ता जप्त करणे अयोग्य आहे. ते राज्यसभा सदस्य आहेत आणि ते एक पत्रकारदेखील आहेत याबाबत मी मोदींना कल्पना दिली आहे. या सर्वांवर पंतप्रधान मोदी निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे’, असं शरद पवार यांनी म्हटलं.


हेही वाचा – माझे शब्द लक्षात लिहून घ्या, सोमय्या देशद्रोही, बाप-बेटे जेलमध्ये जाणार, राऊतांचा पुन्हा इशारा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -