घरमहाराष्ट्रकाँग्रेसमुळे सरकार, आमच्या नेत्यांवर टीका करणं थांबवा; नाना पटोलेंचा राऊतांना इशारा

काँग्रेसमुळे सरकार, आमच्या नेत्यांवर टीका करणं थांबवा; नाना पटोलेंचा राऊतांना इशारा

Subscribe

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी युपीएच्या नेतृत्वावर भाष्य करत काँग्रेसची नाराजी ओढावून घेतली आहे. सातत्याने संजय राऊत काँग्रेसच्या नेत्यांवर भाष्य करत आहेत. यावरुन आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजयराऊत यांना इशारा दिला आहे. राज्यात काँग्रेसमुळे सरकार आहे हे लक्षात असु द्या आणि काँग्रेस नेत्यांवर टीका करण थांबवा, असा इशारा नाना पटोले यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

गेले काही दिवस संजय राऊत युपीएवरुन काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांवर टीका करत आहेत. यावरुन नाना पटोले यांनी राऊतांना इशारा दिला आहे. संजय राऊत सातत्याने आमच्या नेत्यांविरोधात टीका करत आहेत. शिवसेना हा पक्ष युपीएचा भाग नाही तरीही ते वारंवार काँग्रेसवर टीका करत आहेत हे काही बरोबर नाही. आमच्यामुळे हे सरकार आहे हे लक्षात ठेवा आणि टीका करणं थांबवा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

- Advertisement -

संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का? असा प्रश्न मी विचारला होता. कालही शरद पवार आणि अमित शहांच्या भेटीवर संजय राऊतांनी ट्विट करुन माहिती दिली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखं वागत आहेत हे आम्ही म्हणत होतो ते स्पष्ट झालं, असं नाना पटोले म्हणाले.

संजय राऊत हे काँग्रेससोबत राष्ट्रवादीच्या देखील निशाण्यावर आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुणीही महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नये, असा सल्ला राऊतांना दिला. अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रीपद मिळालं, असं राऊत म्हणाले होते. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी राऊतांना इशारा दिला. राज्यात तीन पक्षांचे सरकार महाविकास आघाडी म्हणून काम करत आहे. या सरकारमध्ये कोणाला मंत्री करायचं, हा त्या त्या पक्षाचा व पक्षाच्या नेत्यांचा अधिकार आहे. सरकार व्यवस्थित चालू असताना इतरांनी, विशेषतः या तीन पक्षांमध्ये कुणीही मिठाचा खडा टाकू नये, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -