मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र लोकसभेत विजयी झालेल्या महाविकास आघाडी पक्षाचा या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच लोकसभेचा निकाल पाहता त्या तुलनेमध्ये काँग्रेसला देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आले आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र आता राज्यातील काँग्रेस पक्षाने याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Signs of organizational change in congress in the state.)
हेही वाचा : Rohit Patil : युवा आमदाराचे पहिलेच भाषण; ‘अमृता’हून ही गोड म्हटल्याने फडणवीसांना हसू अनावर
राज्यातील विधानसभेच्या अपयशानंतर आता राज्यभरात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बदलणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. मात्र पक्षात खरचं प्रदेशाध्यक्ष बदलाचा सूर आहे का? यावर अमित देशमुख यांनी पक्षाकडून स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलणार अशी कुठलीही चर्चा सुरु नाही. नाना पटोले हेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत देखील नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष असतानाच काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. त्यामुळे ते यश विसरून कसे चालेल असा प्रश्न अमित देशमुखांनी उपस्थित केला आहे. तसेच आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिजे तसा निकाल लागला नाही, म्हणून एखाद्यावर टीका करणे हे योग्य नाही. तसेच प्रदेशाध्यक्ष बदलाविषयी या चर्चांना काहीही अर्थ नसल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा : Jayant Patil on Fadnavis : गेल्या 5 वर्षांत फडणवीसांमध्ये झाला हा बदल; जयंत पाटलांनी भरसभेत सांगितले…
तसेच ते म्हणाले, एकदा पराभव झाल्यानंतर तो स्वीकारून पुन्हा कामाला लागावे लागते. आता काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा कामाला लागला आहे. आमची वैचारीक लढाई सुरु आहे आणि सुरु राहणार आहे. काँग्रेसचा विचार आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. अशाप्रकारे अमित देशमुखांनी पक्षाकडून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे विरोधीपक्ष नेत्याबाबतची मागणी केलेली आहे. महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद त्यांनी दिले पाहिजे. त्याचा विचार ते करत असतील, असे यावेळी त्यांनी सांगितले आहे.
Edited By Komal Pawar Govalkar