Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रCongress Survey : निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मिळाले होते पराभवाचे संकेत

Congress Survey : निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मिळाले होते पराभवाचे संकेत

Subscribe

काँग्रेसच्या एका सर्वेक्षणानुसार विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा पराभव होणार हे स्पष्ट झाले होते. तसेच सर्व्हेनुसार काँग्रेसला 85 जागा, शरद पवार गटाला 55 ते 60 जागा तर ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, मात्र चित्र पुर्णपणे उलटे झाले आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये महायुती सरकारचा बहुमतांनी विजय झाला असून महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. तसेच महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसकडून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र काँग्रेसकडून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा पराभव होणार हे स्पष्ट झाले होते. तसेच सर्व्हेनुसार काँग्रेसला 85 जागा, शरद पवार गटाला 55 ते 60 जागा तर ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, मात्र चित्र पुर्णपणे उलटे झाले आहे. (Congress had lost maharashtra in october itself party survey revealed.)

हेही वाचा : HC about Hindu Religion : …एवढा हिंदू धर्म कमकुवत नाही, केरळ हायकोर्टाची टिप्पणी

- Advertisement -

लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीला मोठा दणका देत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले होते. याचदरम्यान काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत सर्व्हे करण्यात आला होता. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याची शक्यता होती, मात्र ती आता फोल ठरली आहे. राज्यात महायुतीच्या घवघवीत यशामागे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही परिणामकारक ठरल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसने केलल्या सर्वेनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला फायदा झाल्याचे समोर आले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या एका नेत्यांने सांगितले होते की, एका बैठकीमध्ये महिलांना महिन्याला 3000 रुपये देणार असे सांगण्यात आले होते. मात्र महायुतीने त्या अगोदरच या योजनेची घोषणा करून राज्यातील महिलांना 1500 रुपये देण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : Raigad Politics : शेकापसोबत हातमिळवणी करणारे तटकरे गद्दार, महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याने संघर्ष चिघळला

- Advertisement -

काँग्रेसने केलेल्या या अंतर्गत सर्वेक्षणामधून उद्धव ठाकरेंना इशारा देत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्या सर्व गोष्टींना आता पूर्णविराम देण्यात आला आहे. सर्वेक्षणातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून मॅजिक फिगर गाठू शकतात, असे समोर आले होते. मात्र हा सर्व्हे पुर्णपणे फोल ठरल्याचे दिसून आले आहे.


Edited By komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -