Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र आम्ही सरकार नाही पण,आमच्यामुळे सरकार आहे

आम्ही सरकार नाही पण,आमच्यामुळे सरकार आहे

नाना पटोले यांचा संजय राऊतांना इशारा

Related Story

- Advertisement -

काँग्रेसवर सातत्याने टीका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कडक इशारा दिला आहे. आम्ही सरकार नाही. पण, आमच्यामुळे सरकार आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी संजय राऊत यांना दम भरला आहे. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) अध्यक्षपदावरून महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी युपीएच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवड करण्याची सूचना काँग्रेसला केली आहे. तसेच शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारा असा सल्लाही राऊत यांनी दिला. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना नेतृत्वाला चांगलेच धारेवर धरले आहे.

आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल ते सातत्याने वक्तव्य करत आहेत. त्यांना सांगितले की शिवसेना काही युपीएचा घटक नाही. पण तरीही ते सातत्याने आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत. आता त्यांना आम्ही सांगितले आहे की, आम्ही सरकार नाही. पण, सरकार आमच्यामुळे आहे, असे पटोले म्हणाले.

- Advertisement -

संजय राऊत सातत्याने आमच्या नेत्यांविरोधात टीका करत आहेत. शिवसेना हा पक्ष युपीएचा भाग नाही तरीही ते वारंवार काँग्रेसवर टीका करत आहेत हे काही बरोबर नाही. आमच्यामुळे हे सरकार आहे हे लक्षात ठेवा आणि टीका करणं थांबवा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का? असा प्रश्न मी विचारला होता. कालही शरद पवार आणि अमित शहांच्या भेटीवर संजय राऊतांनी ट्विट करून माहिती दिली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहेत हे आम्ही म्हणत होतो ते स्पष्ट झाले, असे नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

संजय राऊत हे काँग्रेससोबत राष्ट्रवादीच्या देखील निशाण्यावर आले आहेत. अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रीपद मिळाले, असे राऊत म्हणाले होते. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राऊतांना इशारा दिला. राज्यात तीन पक्षांचे सरकार महाविकास आघाडी म्हणून काम करत आहे. या सरकारमध्ये कोणाला मंत्री करायचं, हा त्या त्या पक्षाचा व पक्षाच्या नेत्यांचा अधिकार आहे. सरकार व्यवस्थित चालू असताना इतरांनी, विशेषतः या तीन पक्षांमध्ये कुणीही मिठाचा खडा टाकू नये, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -