घरताज्या घडामोडीसत्यजित तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, नाना पटोलेंचं मोठं विधान

सत्यजित तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, नाना पटोलेंचं मोठं विधान

Subscribe

विधान परिषद निवडणुकीत सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. शिवाय सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांचा बंडखोर असाही उल्लेख नाना पटोले यांनी केला. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती.

विधान परिषद निवडणुकीत सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. शिवाय सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांचा बंडखोर असाही उल्लेख नाना पटोले यांनी केला. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत डॉ. तांबे यांनी अर्ज सादर केला नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी काँग्रेसची बाजू स्पष्ट केली आहे. (Congress will not support Satyajeet Tambe Nana Patole big statement)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नसेल, असे विधान केले. तसेच, पुढील निर्णय हायकमांड घेईल त्यानंतर याबाबत कारवाई केली जाईल. पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

“आम्ही पक्षाकडून डॉ, सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. पण डॉ. सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता एकप्रकारे पक्षासोबत फसवेगिरी केली. आपल्या मुलाचा अपक्ष फॉर्म भरून भाजपा पाठिंबा असल्याचे दर्शवले. कारण तांबे यांनी सांगितले की आम्ही भाजपाचा पाठिंबा घेणार हे एकप्रकारे काँग्रेसला धोका दिल्यासारखे आहे. त्यामुळे याबाबत हायकमांडला माहिती देण्यात आली आहे. आज यावर हायकमांड निर्णय घेणार असून, त्यांच्या निर्णयानंतर कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू. परंतु, बडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही”, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

विधान परिषद निवडणुकीत भाजपविरोधात एकजुटीने उमेदवार देण्याचे निश्चित झाले असताना महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे गुरुवारी समोर आले. नाशिकमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरल्याने काँग्रेसचीच कोंडी झाली. येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा गुरुवारी सकाळी दिल्लीतून करण्यात आली, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत डॉ. तांबे यांनी अर्ज सादर केला नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. अपक्ष अर्ज सादर करून सत्यजित तांबे यांनी एकप्रकारे काँग्रेसला सोडचिठ्ठीच दिली आहे.


हेही वाचा – नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे ‘इन’ ,वडील डॉ. सुधीर तांबे रिंगणातून ‘आऊट’

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -