घरताज्या घडामोडीकाँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात नागपूरच्या जीपीओ चौकात पेटवली कार

काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात नागपूरच्या जीपीओ चौकात पेटवली कार

Subscribe

नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची चौकशी केली जात आहे. ही चौकशी संध्याकाळपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या इडीच्या चौकशी विरोधात नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. ही चौकशी संध्याकाळपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या ईडीच्या चौकशी विरोधात नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा हात घेत जीपीओ चौकात एक कार पेटवून दिली. कार पेटवल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत काही काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. (Congress Workers Car In Nagpur Protest Against Sonia Gandhi Ed Investigation)

ईडीच्या चौकशीविरोधात नागपूरमध्ये काँग्रेसच्या आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप आणि पंतप्रधानविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनावेळी अचानक काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका कारला आग लावली. या आगीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पळ काढला.

- Advertisement -

या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. कार पेटवल्याचे समजताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यात आली. शिवाय, पोलिसांनी सर्वपरिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडीद्वार चौकशी करून त्यांना सतत त्रास दिला जात आहे. याविरोधात नागपूरमध्ये तीव्र आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आंदोलकांनी प्रसारमाध्यमांना दिली.

- Advertisement -

याशिवाय, “मोदी सरकार जेव्हा जेव्हा घाबरते, ईडीला पुढे करते. याविरोधातही आंदोलन केले आहे”, असेही कार्यकर्त्यांनी म्हटले. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. मात्र या केंद्रीय तपास यंत्रणांचा ठाण्यातील कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला आहे.


हेही वाचा – ठाकरे खोटारडे आणि कपटी, नारायण राणेंचा हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -