एसटी महामंडळाला १ हजार कोटीचे अनुदान द्या; एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेची मागणी

एसटी महामंडळाला १ हजार कोटीचे अनुदान द्या, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

six thousand st buses will be out service 15 million passengers will be hit hard

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन, डिझेल खर्च आणि इतर खर्च भागविण्यासाठी शासनाकडील विविध सवलतीच्या प्रतिपूर्तीच्या थकबाकीची रक्कम तात्काळ द्यावी. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार कोटींचे अनुदान एसटी महामंडळास द्यावे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्याच्या वेतनासह एप्रिल, मे २०२० या महिन्याचे वेतन देण्यात यावे, यासह विविध मागण्या महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शासकिय, निमशासकीय महामंडळ आणि मंडळ त्यासोबतच आस्थापना आणि कंपनी कामगारांसह असंघटीत कामगारांना दिलासा देण्याच्या हेतूने विविध प्रकारे उपाय योजना करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार अत्यंत खंबीरपणे कार्य करीत असून ही बाब कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ७ तारखेला अदा केले जाते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने २३ मार्च २०२० पासून एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयानुसार एसटी सेवा बंद असल्यामुळे वेतनाकरीता महामंडळाकडे पुरेशी रक्कम उपलब्ध नव्हती.

शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सन २०१९-२०२० या वर्षातील विविध प्रवास सवलत मुल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी द्यावयाच्या रक्कमेपैकी १५० कोटी रूपये शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्याचे वेतन १०० टक्के, ७५ टक्के, ५० टक्के प्रमाणे पहिल्या टप्प्यात अदा करण्यात आलेले आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्यांचे एप्रिल २०२० मध्ये उर्वरीत दुसऱ्या टप्याचे वेतन देऊ केले आहे. तर एप्रिल महिन्याचे वेतन मे २०२०च्या १ मे, २०२० आणि ७ मे, २०२० अशा तारखेस देण्यात यावे. त्याचप्रमाणे वेतनास विलंब होणार नाही यासंदर्भात योग्य ते नियोजन करण्यात यावे.


हेही वाचा – पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेले १६ जण निगेटिव्ह