Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राहुल गांधींवरुन जाहीरात केल्याने काँग्रेस आक्रमक; कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

राहुल गांधींवरुन जाहीरात केल्याने काँग्रेस आक्रमक; कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींवरुन जाहीरात केल्याने मुंबई काँग्रेसने आक्रमक होत जाहीरात बनवणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. स्टोरिया असं या जाहीरात बनवणाऱ्या कंपनीचं नाव आहे. मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाहीरात बनवणारी स्टोरिया कंपनीची तोडफोड केली आहे. दरम्यान, पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

स्टोरिया या फूड्स अँड बेवरेजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एका चॉकलेट शेकची जाहीरात केली आहे. यामध्ये राहुल गांधी यांचं विडंबन करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आमच्या नेतृत्वाबद्दल अशापद्धतीने जाहीरात केली तर खपवून घेणार नसल्याचं मुंबई काँग्रेसने म्हटलं. काँग्रेसने कंपनीच्या अंधेरी स्थित कार्यलयात जाऊन तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

तोडफोड केली त्याला समर्थन – भाई जगताप

- Advertisement -

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाी जगताप यांनी कार्यकर्त्यांनी तोडफोड केली त्याचं समर्थन केलं आहे. विडंबन करणारी जाहीरात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चिड येणं स्वाभाविकच आहे. आमच्या नेतृत्वाला अशा पद्धतीने वापर करणं योग्य नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला गेले होते. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उद्धटपणे उत्तरं दिली. त्यामुळे ही प्रतिक्रिया उमटली, असं भाई जगताप म्हणाले..

- Advertisement -