एकच कुटुंबाने राजकीय पक्ष चालवणं हे लोकशाहीसाठी संकट, मोदींचा घराणेशाहीवर निशाणा

Constitution Day pm narendra modi criticize on political family congress
एकच कुटुंबाने राजकीय पक्ष चालवणं हे लोकशाहीसाठी संकट, मोदींचा घराणेशाहीवरून कॉंग्रेसवर निशाणा

देशात एकाच कुटुंबाकडे पिढ्यानपिढ्या राजकीय पक्षाचे नेतृत्व असेल तर ते लोकशाहीसाठी संकटाचे आहे. असे वक्तवय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशाच्या ७१ व्या संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या विशेष कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी लोकशाहीवरुन राजकीय घराणेशाहीवर भाष्य केलं आहे. तसेच २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मरण केलं आहे. आजचा दिवस महान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महान व्यक्तींना नमन करण्याचा दिवस असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

देशाच्या ७१ व्या संविधानानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमावर शिवसेना, काँग्रेस, आम आदमी पार्टी यांसह अनेक राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला होता. पंतप्रधानांनी या कार्यक्रमादरम्यान देशातील राजकीय घराणेशाहीवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नाव न घेता मोदींनी अप्रत्यक्षपणे घराणेशाही असलेल्या राजकीय पक्षांवर टीका केली आहे. मोदी म्हणाले की, “पार्टी फोर द फॅमिली, “पार्टी बाय द फॅमिली” असे घराणेशाही असलेल्या पक्षांना मोदींनी संबोधले. तसेच देशाचे संविधान आपल्याला सांगते त्याच्या विपरित आहे. घराणेशाही पार्टीचा उल्लेख करतो त्यावर असे मत नाही की एकाच परिवारातील अनेक सदस्यांनी राजकारणात येऊ नये. जनतेच्या आशिर्वादाने ते येऊ शकतात. परंतु जर पिढ्यानपिढ्या पक्षाचे नेतृत्व एकाच कुटुंबाकडे असेल तर ती पार्टी चांगल्या लोकशाहीसाठी संकट आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

जपानमध्ये घराणेशाही संपुष्टात आली

जपानमध्ये एक प्रयोग झाला होता. जपानमध्ये काही राजकीय पक्षच राजकारणात सक्रिय होते. परंतु कोणीतरी नवे राजकीय नेते तयार करण्यासाठी प्रयत्न केले आणि घराणेशाहीविरोधात नवे नेतृत्व तयार केले.

मुंबई हल्ल्यातील शहीदांचे स्मरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज २६/११ चा दिवस आहे. देशासाठी दुःखद दिवस आहे. देशाच्या शत्रूंनी मुंबईत येऊन दहशतवादी हल्ला केला. सामान्य माणसांचे रक्षण करण्यासाठी अनेक शूर जवानांनी आणि पोलिसांनी दहशतवाद्यांशी लढा दिला आणि आपले प्राण गमावले. यामध्ये काही नागरिकांनाही प्राण गमवावा लागला. ज्या पोलिसांनी आणि जवानांनी लढा दिला त्या शूरवीरांना नमन करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


हेही वाचा : देशात हुकूमशाही पद्धतीने काम मग संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी?; राऊतांचा केंद्राला सवाल