उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार की नाही?, घटनातज्ज्ञांनी दिलं स्पष्टीकरण

शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण कोणाचा?, यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. परंतु पक्षप्रमुख वादाचा पेच अद्यापही कायम आहे. ठाकरे गटाने पक्षांतर्गत निवडणुकीसाठी आयोगाला विनंती केली होती. तसेच निवडणूक शक्य नसल्यास उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदावर कायम ठेवण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार की नाही?, याबाबत घटनातज्ज्ञांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

घटनातज्ज्ञांनाच्या मतानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगात प्रत्यक्ष तसा कायदा नाही, परंतु सर्वधारण कायद्यानुसार राज्यपाल हे पाच वर्षासाठी असतात, मात्र त्यांचा कालावधी संपला तरी नवीन राज्यपाल येईपर्यंत ते पदावर असतात. राज्यपालांच्या निवडीप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्याबाबत होऊ शकतं, नवीन कोणाची निवड झाली नाही तर उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख पदावर राहतील, असं घटनातज्ज्ञांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी याबाबत नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत घेत माहिती दिली होती. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच घटनातज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे.

ठाकरे गटाने काय भूमिका मांडली?

ठाकरे गटाने आतापर्यंतच्या सुनावणीमध्ये जे मुद्दे मांडले होते तेच मुद्दे लेखी उत्तरातही मांडण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारे मुख्य नेतेपद हे घटनात्मक नाही, असा मुद्दा ठाकरे गटाने आपल्या लेखी उत्तरात मांडला आहे. एकनाथ शिंदे यांनी नेमकी कशी बंडखोरी केली याबाबत सविस्तर मत मांडण्यात आलं आहे.

शिंदे गटाने काय भूमिका मांडली?

मूळ पक्ष आम्हीच आहोत. त्यामुळे आम्हाला पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह मिळावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेतेपद घटनात्मक आहे. पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या आमच्याकडे जास्त आहे. बहुमत आमच्याकडे आहे, अशी भूमिका शिंदे गटाकडून लेखी उत्तरात मांडण्यात आली आहे.


हेही वाचा : Live Update : ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे लेखी उत्तर सादर