Homeताज्या घडामोडीNashik : वकील संघातर्फे संविधान साक्षरता मोहीम प्रभात फेरी

Nashik : वकील संघातर्फे संविधान साक्षरता मोहीम प्रभात फेरी

Subscribe

Constitutional literacy campaign by the Lawyers’ Association

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा आणि नाशिक बार असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने संविधान अमृत महोत्सव अंतर्गत रविवारी (दि.२६) सकाळी ९ वाजता संविधान साक्षरता मोहीम प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीचे उदघाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलानी व जिल्हा न्यायाधीश एन. व्ही. जिवणे यांच्या हस्ते व महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. जयंत जायभावे आणि नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

भारताने संविधान स्विकारुन ७५ वर्ष पूर्ण झालेले आहेत. भारताच्या प्रजासत्ताक दिनास देखील ७६ वर्ष पूर्ण झालेले आहेत. याप्रसगांचे औचित्य साधून लोकशाही बळकट होण्यासाठी व संविधानाची साक्षरता सामान्य जनतेत यावी, याकरिता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. फेरीच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांनी हवेत तिरंगी फुगे सोडले. फेरीमध्ये वकिलांसह मराठा विद्या प्रसारक समाजाचे एन. सी. सी. व नॅव्हेल केडट्स आणि नागरीक सहभागी झाले होते.

प्रभात फेरीचा चित्ररथ व वकिलांच्या हातातील फ्लॅकर्स हे आकर्षणाचे प्रमुख केंद्रबिंदू ठरले. प्रभात फेरीप्रसंगी कॉग्रेस कमिटीतर्फे अ‍ॅड. आकाश छाजेड व त्यांचे सहकारी आणि सार्वजनिक वाचनालयातर्फे अ‍ॅड. अभिजीत बगदे व त्यांचे सर्व सहकारी यांनी संविधान पूजन करुन फेरीमध्ये सहभागी झाले.

संविधान प्रभात फेरीमध्ये नाशिक बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. वैभव शेटे, सचिव अ‍ॅड. हेमंत गायकवाड, सहसचिव अ‍ॅड. संजय गिते, महिला सहसचिव अ‍ॅड. सोनल गायकर, सदस्य अ‍ॅड, शिवाजी शेळके, अ‍ॅड. प्रतिक शिर्दे, अ‍ॅड. महेश यादव, अ‍ॅड. अश्विनी गवते, अ‍ॅड. वैभव घुमरे तसेच अँड. दिलीप वनारसे, अ‍ॅड. एम. टी.क्यु. सय्यद, अ‍ॅड. फारुख शेख, अ‍ॅड. सुधीर कोतवाल, अ‍ॅड. अजित छल्लानी, अ‍ॅड. कैलास पाटील, अ‍ॅड. रमेश ढेमसे आदी वकील सहभागी झाले होते.