घरताज्या घडामोडीजून अखेर शहरात ३० सीएनजी स्टेशनची निर्मिती

जून अखेर शहरात ३० सीएनजी स्टेशनची निर्मिती

Subscribe

२० हजार घरांतील गॅस पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण

नाशिक शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने सुरु असलेल्या सीएनजी व पीएनजी भूमिगत गॅस पाईप लाईन व प्रकल्पाचे काम सुरु असून जून अखेरपर्यंत शहरात ३० सीएनजी स्टेशनची निर्मिती पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर नाशिक शहरातील आतापर्यंत २५ हजार ग्राहकांनी पीएनजी घरगुती गॅस जोडणी बाबत नोंदणी केली आहे. त्यातील जवळपास २० हजार घरांतील गॅस पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण झाले आहे अशी माहीती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे प्रकल्प अधिकारी संदीप श्रीवास्तव यांनी दिली. या प्रकल्पाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेऊन प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेतली.

शहरात हायप्रेशर, मिडीयम प्रेशर व लो प्रेशर पाईप लाईनचे काम प्रगतीपथावर असून लवरकरच नागरिकांना घरगुती गॅस उपलब्ध होणार आहे. तसेच सीएनजी स्टेशनच्या माध्यमातून शहरातील फोर व्हीलर वाहने तसेच बसेसला गॅस उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक वापरासाठी देखील गॅस उपलब्ध होणार आहे. या सर्व प्रकल्पाच्या कामकाजाची मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे अभियंता आदित्य रामदासी यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर ही कामे पूर्ण करून नागरिकांना गॅसच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केलेल्या आहे. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -