Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोरोना संकटात खारीचा वाटा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि...

कोरोना संकटात खारीचा वाटा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि राष्ट्रवादीकडून दोन कोटीची मदत

राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांच्या एका महिन्याच्या वेतनाचा समावेश

Related Story

- Advertisement -

कोरोना संकटात सर्व नेते आणि नागरिक राज्य सरकारला आर्थिक मदत करत आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य गेल्या वर्षभरापासून यापूर्वी कधीही न पाहिलेल्या आपदेला तोंड देत आहे. राज्यातील जनता व प्रशासन या आपदेसोबत जोमाने लढत असले तरी एकूणच जगभरचा आर्थिक विकास मंदावला असल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. तसेच राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला असल्याने राज्याच्या तिजोरीवर आधीपेक्षा अधिक भार पडणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला सहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. म्हणूनच कोरोना सोबत लढण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नागरिकांच्या सहाय्यासाठी तत्पर असल्याचे सांगतानाच या निधीचा स्वीकार करावा अशी विनंती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी अजितदादा पवार, ट्रस्टी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ट्रस्टी आणि खासदार सुप्रियाताई सदानंद सुळे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबईच्या युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांनी केली आहे.

राज्यातील प्रशासन व जनता कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटासोबत जोमाने लढा देत आहे. पण एकूणच जगभराचा आर्थिक विकास मंदावला असल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला असल्याने राज्याच्या तिजोरीवरचा भार अधिक वाढणार आहे. त्यामुळे या संकटकाळात आपली सामाजिक बांधिलकी जपत पक्ष मदतीसाठी पुढे सरसावला आहे. आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या साहाय्यासाठी पक्ष नेहमीच तत्पर आहे.

- Advertisement -