वादग्रस्त अधिकारी रश्मी शुक्ला यांना बढती, सीमा बलाच्या महासंचालकपदावर नियुक्ती 

Rashmi Shukla Transferred | रश्मी शुक्ला ह्या मार्च २०१६ ते जुलै २०१८ या कालावधीत पुणे पोलीस आयुक्त होत्या. हैद्राबाद येथील येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

Phone Tapping Case Bombay High Court grants relief from arrest to former Pune CP Rashmi Shukla till 25th March

Rashmi Shukla Transferred | मुंबई – फोन टॅपिंग प्रकरणी (Phone Tapping Case) वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांना सीमा बलाच्या महासंचालकपदावर (Director General of Border Force) नियुक्ती करण्यात आली आहे. त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये अतिरिक्त महासंचालकपदावर होत्या.

रश्मी शुक्ला ह्या मार्च २०१६ ते जुलै २०१८ या कालावधीत पुणे पोलीस आयुक्त होत्या. हैद्राबाद येथील येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे आता बदली होऊन सीमा बलाच्या महासंचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – रश्मी शुक्लांची फाइल पुन्हा उघडली, फोन टॅपिंगप्रकरणी नव्याने चौकशी होणार

राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या काळात काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना खासदार संजय राऊत, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप करण्यात आले होते. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवला होता.

यानंतर पुण्याच्या बंडगार्डन आणि मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रश्मी शुक्ला केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून गेल्या. तरी याप्रकरणी पोलिसांनी त्यांना समन्स बजावून चौकशी केली. त्यामुळे शुक्ला यांच्यावर याप्रकरणी अटकेची टांगती तलवार होती.

हेही वाचा – रश्मी शुक्लांनी कोणाच्या आदेशाने फोन टॅप केले?

परंतु शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच रश्मी शुक्ला यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तर मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर रश्मी शुक्ला यांना राज्य सरकारने याप्रकरणी क्लीन चिट दिली होती. या क्लीन चिटनंतर रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर करण्यात आला होता.