Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोरोनामुळे जे मरतात ते जगायच्या लायकीचे नाहीत, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

कोरोनामुळे जे मरतात ते जगायच्या लायकीचे नाहीत, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

Related Story

- Advertisement -

सांगलीतील लॉकडाऊन विरोधात भाजपने आंदोलन केले या आंदोलनात संभाजी भिडे यांनी हजेरी लावली होती. या आंदोलनादरम्यान संभाजी भिडे यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. संभाजी भिडेंनी या आंदोलनात पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोणत्या शाहण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला. कोरोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत. मुळात कोरोना हा रोगच नाही. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांविरोधात भाजपने आंदोलन केले आहे या आंदोलात कोरोनाने मानसं मतात ती जगण्याच्या लयकीची नाहीत असे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटले आहे की, मुळात कोरोना हा रोग नाही. आणि कोरोनाने जी माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. दारुची दुकाने उघडी त्यांना परवानगी आणि कुठे काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात, काय चावटपणा चालला आहे. कोरोना हा रोगच नाही. हा..वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही. असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. या आधीसुद्धा संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

सांगली जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या मिनी लॉकडाऊनविरोधात व्यापारी वर्गात तीव्र असंतो निर्माण झाला आहे. सांगलीत केलेल्या लॉकडाऊनच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात कोरोना नियमांचे उल्लंघन झाले आहे.

- Advertisement -