घरताज्या घडामोडीईडीच्या धाडसत्रानंतर संजय राऊत यांच्या रायगडमधील मालमत्ता चर्चेत

ईडीच्या धाडसत्रानंतर संजय राऊत यांच्या रायगडमधील मालमत्ता चर्चेत

Subscribe

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय, उद्योजक प्रवीण राऊत यांच्या दोघा निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर ईडीने गुरुवारी छापे टाकले आहेत. बेनामी जमिनीप्रकरणी हे छापे टाकण्यात आले असून ठाणे आणि रायगडमधील काही मालमत्तांवर ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी अधिक वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. ठाणे आणि रायगडमधील या कारवाईसाठी दिल्ली ईडीचे सुमारे 25 ते 30 अधिकारी आणि कर्मचारी ठाणे आणि रायगडमध्ये दाखल झाले असल्याचे वृत्त आहे. मात्र यासंदर्भात रायगड पोलिस तसेच स्थानिक पोलिस ठाण्यात कोणतीच माहिती नसल्याचे पुढे आले आहे.

राऊत यांची मालमत्ता असलेल्या अलिबाग तालुक्यात कोणतीही कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट झाले असले तरी येत्या एक दोन दिवसात कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रायगडमध्ये प्रवीण राऊत यांची सुमारे 1 कोटी रुपयांची बेनामी जमीन असल्याचे सांगण्यात येत आहे. पर्लग्रुप नावाच्या कंपनीने लोकांचे कोट्यवधी रुपये बुडवल्यानंतर सेबीने या कंपनीवर कारवाई केली होती. याच कंपनीने प्रवीण राऊत यांना 1 हजार कोटी रुपये दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याच पैशातून राऊत यांनी जमिनी खरेदी केल्या होत्या. ही मालमत्ता बेनामी असल्याने आता ईडीने कारवाई सुरू केल्याचे समजते.

- Advertisement -

उद्योजक प्रवीण राऊत यांना ईडीने 2 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. गोरेगाव येथील भूखंडाच्या विक्रीमध्ये एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याचा राऊत यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राऊत यांना अटक करण्यात आली. प्रवीण राऊत यांनी 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यावेळी ईडीने प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांची झडती घेतली होती.


हेही वाचा – Yashwant Jadhav IT Raid: जे डर्टी नेते आहेत त्यांच्यावर कारवाई सुरूच राहणार – किरीट सोमय्या

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -