घरमहाराष्ट्रखासदार - केंद्रीय मंत्री वाद विकोपाला, संजय राऊतांचा नारायण राणेंवर मानहानीचा दावा

खासदार – केंद्रीय मंत्री वाद विकोपाला, संजय राऊतांचा नारायण राणेंवर मानहानीचा दावा

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या खासदारकीबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या दाव्यावरून वाद निर्माण झाला असून हा वाद आता विकोपाला गेला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांना खासदार बनवले आणि त्यासाठी मी पैसा खर्च केला, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 2004मध्ये आपल्याला संजय राऊत यांना खासदार बनविण्यास सांगितले होते. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यालाच खासदार बनवायचे होते. पण बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मी संजय राऊत यांचा अर्ज भरून घेतला होता. निवडणुकीच्या यादीत त्यांचे नाव देखील नव्हते, असा दावा नारायण राणे यांनी अलीकडेच केला आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांनी संजय राऊत यांच्या अर्जावर आक्षेप घेतला. पण संजय राऊत हा माझा माणूस असल्याचे सांगत मी विनंती केल्यावर रोहिदास पाटील यांनी पुढे आक्षेप घेतला नाही, असे सांगून नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत यांना खासदार बनविण्यासाठी किती पैसा खर्च केला ते आता सांगणार नाही.

- Advertisement -

संजय राऊत यांनी नारायण राणे याचा हा दावा फेटाळत मला खासदार शिवसेना प्रमुखांनी केले, असे सांगितले. त्यांनी याप्रकरणी राणेंना नोटीस पाठविली आहे. यादीत माझे नाव नव्हते, हे नारायण राणे यांनी सिद्ध करून दाखवावे. तसेच, पैसे खर्च केले म्हणजे नेमके काय केले होते? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. असे पैसे खर्च करणे म्हणजे लाचलुचपतप्रतिबंधक कायद्याअंतर्गत हे प्रकरण येते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -