घर महाराष्ट्र महायुतीत वाद; बीडमध्ये पडळकरांचा पुतळा जाळला; दिसतील तिथे चोपणार, अजित पवार गट...

महायुतीत वाद; बीडमध्ये पडळकरांचा पुतळा जाळला; दिसतील तिथे चोपणार, अजित पवार गट आक्रमक

Subscribe

गोपीचंद पडळकर म्हणाले की, अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचं पिल्लू. त्यामुळे मी त्यांना पत्र लिहायचा विषय नाही, ते आता जरी आमच्यासोबत आले असले तरी त्यांची भूमिका वेगळी आहे, असं पडळकर म्हणाले होते. त्यानंतर आता अजित पवार गट आक्रमक झाला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचं पिल्लू. त्यामुळे मी त्यांना पत्र लिहायचा विषय नाही, ते आता जरी आमच्यासोबत आले असले तरी त्यांची भूमिका वेगळी आहे, असं पडळकर म्हणाले होते. त्यानंतर आता अजित पवार गट आक्रमक झाला आहे. (Controversy in the Mahayuti Gopichand Padalakar Beed Ajit Pawar group )

महायुतीत वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले असून अजित पवार समर्थक आक्रमक झाले आहेत. पडळकर जिथे दिसतील त्या ठिकाणी त्यांना चोप देणार असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

- Advertisement -

(हेही वाचा: सगळी संकटे दूर कर…मुख्यमंत्री शिंदेंचं गणराया चरणी साकडं )

पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळून अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. तसंच, भाजप आमचा मित्र पक्ष असला तरी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा देखील देण्यात आला आहे. तसचं, भाजपने तत्काळ पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील यावेळी राष्ट्रवादीचे नेते योगेश श्रीरसागर यांनी केली आहे.

रोहित पवारांचीही टीका

- Advertisement -

अजित पवारांवर वादग्रस्त टीका करणाऱ्या पडळकर यांच्यावर रोहित पवार यांनीदेखील टीका केली आहे. राष्ट्रीय राजकारणातील आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांवर बोलताना काही लोकप्रतिनिधी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपूर्वक पातळी सोडून बोलतात. उगाच गरळ ओकून वातवरण खराब करणाऱ्या अशा वाचाळवीरांना फडणवीसांनी समज द्यायला हवी, अन्यथा टीका करण्यासाठीच अशा वाचाळवीरांना आमदारकी दिली हे जाहीर करावं. कुठल्याही पक्षाचे नेते असोत त्यांच्यावर टीका टिप्पणी करताना सर्व पक्षांनी महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का बसणार याची काळजी घ्यायलाच हवी, असं रोहित पवार म्हणाले.

- Advertisment -