घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक आणि शिर्डी यांसह शिंदे गटाच्या १३ खासदारांच्या मतदारसंघात भाजपने नेमले संयोजक;...

नाशिक आणि शिर्डी यांसह शिंदे गटाच्या १३ खासदारांच्या मतदारसंघात भाजपने नेमले संयोजक; काय आहे प्लॅन?

Subscribe

नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजप आणि शिंदे गट एकत्र लढवणार असले तरी, जागा वाटप निश्चित होण्यापूर्वीच भाजपने शिंदे गटाच्या १३ खासदारांच्या मतदारसंघात संयोजकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे युतीत जागा वाटपावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता निर्माण झाली आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुका कधी होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी त्याअनुषंगाने तयारी मात्र आतापासूनच सुरू झाली आहे. केंद्रातील भाजप सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मोदी सरकारने राबविलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचिण्यासाठी भाजपने मोहिम हाती घेतली आहे. सत्ताधारी तसेच विरोधकांच्या गोटातूनही निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बैठका झडू लागल्या आहेत. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला तर शिंदे गटाचीही बेठक मंत्री शंभुराजे देसाई यांच्या निवासस्थानी झाली.

- Advertisement -

आगामी निवडणुका भाजप शिंदे गट एकत्रित लढणार असले तरी, शिंदे गटाला किती जागा मिळणार याबाबत जागेचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. याआधीच शिंदे गटाचा दावा असलेल्या १३ खासदारांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपने संयोेजकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात देवयानी फरांदे यांना, तर शिर्डीत सुजय विखे-पाटील यांना संयोजक म्हणून जवाबदारी देण्यात आली आहे. हे भाजपाचे दबावतंत्र असल्याची शिंदे गटात कुजबुज सुरू झाली आहे. भाजपने अचानक हे संयोजक नेमल्याने भाजप शिंदे गटावर कुरघोडी करत आहे काय? असा सवाल केला जात आहे.

याच मतदारसंघात संयोजक का?

मागच्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेनेला 22 जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी 18 जागांवर शिवसेना निवडून आली होती. त्यातील 13 खासदार शिवसेनेतून फुटले. ते शिंदे गटात आले. भाजपला जर मतदारसंघाचा आढावा घ्यायचा होता तर त्यांनी संपूर्ण 48 लोकसभा मतदारसंघात घ्यायचा होता किंवा शिवसेनेला ज्या 23 जागा सोडण्यात आल्या त्या मतदारसंघात संयोजक नेमून आढावा घ्यायचा होता. 13 मतदारसंघातच संयोजक नेमण्याचे कारण काय? यामागे काय काळेबेरे आहे? असा प्रश्न या निमित्ताने केला जात आहे.

भाजप कॅडरबेस पार्टी आहे. संयोजक नेमल्यामुळे शिंदे गटात अजिबात नाराजी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठीच संयोजकांनी नेमणूक करण्यात आली आहे. उमेदवार निवडण्याचा किंवा जाहीर करण्याचा आम्हाला अधिकार नाही. भाजपाच्या या अभियानाचा फायदा आमच्या दोन्ही पक्षांना होणार आहे. शिंदे गट नाराज होण्याचा किंवा अस्वस्थ होण्याचा काहीच प्रश्न नाही. फक्त मोदींजींचे काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आम्ही काम करणार आहोत. :  प्रा. देवयानी फरांदे, आमदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -