Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीमुक्त विद्यापीठाचा २० डिसेंबरला दीक्षांत सोहळा

मुक्त विद्यापीठाचा २० डिसेंबरला दीक्षांत सोहळा

Subscribe

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत (पदवीदान सोहळा बुधवारी (दि. २०) रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे. २०२२ – २०२३ शैक्षणिक वर्षात (डिसेंबर २०२२ मार्च २०२३ व मे/जून २०२३ परीक्षांमध्ये) उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवीग्रहण करण्यासाठी येऊ विद्यार्थ्यांनी इच्छिणार्‍या https://29convocatio n.ycmou.ac.in/attend ance या लिंकवर जाऊन आपल्या उपस्थितीबाबतची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरावी. तरच सोहळ्यात प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

नोंदणी लिंक ११ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. यास मुदतवाढ मिळणार नाही. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी ग्रहण करता येईल. ज्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केलेली नाही, त्यांची पदविका / पदवी प्रमाणपत्रे दीक्षांत सोहळ्यानंतर काही कालावधीत त्यांच्या अभ्यासकेंद्रामार्फत वितरीत केली जातील. त्यांना विद्यापीठात येण्याची आवश्यकता नाही. सोहळ्यास विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -