घरCORONA UPDATECorona : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह

Corona : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आली आहे. महापौरांना ताप आल्यानंतर त्यांची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबत त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून माहितील दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, थोडासा ताप आल्याने मी माझी कोविड १९ टेस्ट केली होती. या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे मोहोळ यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

कोरोना झाला असला तरी यातून लवकरच बरा होईन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ‘माझी प्रकृती आता स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेन. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहीन’, असेही त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा –

MMRDA कंत्राटदारांकडील १७ हजार पदांसाठी ६ जुलैपासून ऑनलाइन रोजगार मेळावे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -