घरCORONA UPDATECorona : पहिल्या लाटेत १,१८,३५३, दुसर्‍यात २,७६,२६२ रुग्ण

Corona : पहिल्या लाटेत १,१८,३५३, दुसर्‍यात २,७६,२६२ रुग्ण

Subscribe

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा सर्वाधिक प्रभावी असल्याचे आकडेवारी समोर आले आहे. पहिल्या लाटेत ११ लाख ८ हजार ३५३ रुग्ण बाधित आले तर दुसर्‍या लाटेत तब्बल २७ लाख ६ हजार २६२ रुग्ण बाधित आढळून आले. विशेष म्हणजे, पहिल्या लाटेत २ हजार ४६२ रुग्णांचा बळी गेला तर दुसर्‍या लाटेत ५ हजार ८९२ रुग्णांचा बळी गेल्याची नोंद आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे. त्यामुळे तिसरी लाटेसुद्धा प्रभावीच असण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तवली जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्रिसूत्री नियमांचे पालन करण्यासह कोरोना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाने एप्रिल २०२० पासून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा कालावधी १ एप्रिल २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत होता. यामध्ये सर्वाधिक ३८ हजार ४९० रुग्ण सप्टेंबर २०२० मध्ये आढळून आले. तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत एप्रिल २०२१ मध्ये सर्वाधिक तब्बल १ लाख ४२ हजार ४१२ नवीन रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले होते. पहिल्या लाटेत १ हजार ७६९ पुरुष आणि ६९३ महिलांचा मृत्यू झाला. तर दुसर्‍या लाटेट १ हजार ६१८ पुरुष अणि १ हजार ३८ महिलांचा मृत्यू झाला. पहिल्या लाटेत मृत्यूदर २.८ टक्के तर दुसर्‍या लाटेत २.१३ टक्के होता. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर हाऊसफुल झाले होते. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेट सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागासह पोलीस व जिल्हा प्रशासनाने प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु केली. त्यामुळे मे आणि जूनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट झाली. परिणामी, मे मध्ये ६१ हजार ९१६ आणि जूनमध्ये ८ हजार ६०६ नवीन रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले.

पहिल्या व दुसर्‍या कोरोनाच्या लाटेमध्ये मृत्यूदरात तुलनेने फरक नाही. दुसर्‍या लाटेतील रुग्णसंख्या वाढल्याने मृत्यूसंख्या अधिक वाटत आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहावे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासह लसीकरण करुन घ्यावे. – डॉ. आनंद पवार, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी, नाशिक

- Advertisement -

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -