घरताज्या घडामोडीCorona : आदिवासी मंत्र्यांच्या चालकामुळेे संपूर्ण आयुक्तालयाचे काम ठप्प

Corona : आदिवासी मंत्र्यांच्या चालकामुळेे संपूर्ण आयुक्तालयाचे काम ठप्प

Subscribe

चालकासह पाडवी काही दिवसांपूर्वी नाशिक मुक्कामी आले होते. त्यानंतर चालकाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. परिणामी आदिवासी मंत्र्यांच्या आणि त्यांच्या चालकाच्या संपर्कात आलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी आता स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे.

आदिवासी विविकास मंत्री के. सी. पाडवी यांचा वाहनचालक पॉझिटिव्ह आढळल्याने आता संपूर्ण आदिवासी आयुक्तालयाचेच काम ठप्प होण्याची वेळ आली आहे. या चालकासह पाडवी काही दिवसांपूर्वी नाशिक मुक्कामी आले होते. त्यानंतर चालकाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. परिणामी आदिवासी मंत्र्यांच्या आणि त्यांच्या चालकाच्या संपर्कात आलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी आता स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे.
राज्यभरातील अनेक आमदार आणि खासदारांना कोरोनाची बाधा झाल्याच्या घटना गेल्या तीन महिन्यांपासून घडत आहेत. याशिवाय सुमारे डझनभर मंत्र्यांनाही करोनाने पछाडल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. त्यामुळे मंत्रालयातील काही विभागांचे कामकाज ठप्प झाले होते. नाशिकमधील राज्याच्या आदिवासी आयुक्तालयाचे कामकाजही आता कोरोनामुळे ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांचे दोन स्वीय सहाय्यक काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे पाडवी यांनी ते नंदुरबारला असताना कोरोनाची टेस्ट केली होती. त्यानंतर पाडवी हे नाशिक मुक्कामी आलेे. ते ज्या वाहनाने नाशकात आले त्या वाहनचालकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मंत्र्यांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या आदिवासी विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे. चालक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाडवी यांनी पुन्हा एकदा आपला स्वॅब देऊन टेस्ट केली आहे. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेले आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी महामंडळाचे नितनितीन पाटील, सहसह आयुक्त डी. के. पानमंद यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे. गंभीर बाब म्हणजे यातील दोघा अधिकार्‍यांना ताप आणि सर्दी-खोकल्याची लक्षणे असल्याचे समजते. त्यामुळे या अधिकार्‍यांच्या संपर्कात आलेले कर्मचारीही आता क्वारंटाईन होण्याच्या मनस्थितीत आहे. परिणामत: आता संपूर्ण आदिवासी विकास विभागाचे कामकाज थांबल्याची परिस्थिती आहे. त्याचा परिणाम संपूर्ण राज्यभरातील आदिवासी विभागाशी संबंधित कामकाजावर होऊ शकतो.

 

Corona :  आदिवासी मंत्र्यांच्या चालकामुळेे संपूर्ण आयुक्तालयाचे काम ठप्प
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -