घरताज्या घडामोडीकोरोनाने घात केला! आईच्या तेराव्याला मुलाचा मृत्यू, पत्नी व मुलांवर उपचार सुरु

कोरोनाने घात केला! आईच्या तेराव्याला मुलाचा मृत्यू, पत्नी व मुलांवर उपचार सुरु

Subscribe

मुलाचा आणि आईचा कोरोनाने जीव घेतला मात्र त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी आणि मुलेही कोरोनाशी झगडत आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती पाहून मन हेलावून जात आहे. कोरोनाच्या भयाण हल्ल्याने अनेक कुटुंब उद्धवस्त होत आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केलाय. संपूर्ण कोरोनाच्या विळख्यात उद्धवस्त झाल्याचे अनेक घटना पाहिल्यात. अशातच पालघरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ऐनशेत गावातील ठाकरे कुटुंबावर कोरोनाने मोठा आघात केला. कुटुंबातील सर्व व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात सापडल्या. मुलाचा आणि आईचा कोरोनाने जीव घेतला मात्र त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी आणि मुलेही कोरोनाशी झगडत आहे. या घटनेमुळे वाडा तालुक्यात कोरोनाचे सावट,लोकांच्या मनात असलेली भिती आणखी वाढली आहे. ठाकरे कुटुंबियांची डोळ्यादेखत झालेली परिस्थिती पाहून गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.

वाड्यातील ऐनशेत गावात राहणाऱ्या सागर ठाकरे यांच्या आई सरिता ठाकरे आणि वडिल सदानंद ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सागरच्या आईचा १० एप्रिलला मृत्यू झाला. आईच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी मुलगा सागरलाही कोरोनाची लागण झाल्याने त्याला कल्याणमध्ये उचारासाठी दाखल केले. त्याची तब्येत सुधारत असतानाच आईच्या बाराव्या अंत्यविधीच्या दिवशीच ४३ वर्षीय सागरचाही कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. १५ दिवसात कुटुंबातील दोघांच्या मृत्यूमुळे पत्नी,मुले, वडिल त्याचप्रमाणे नातेवाईक, मित्रमंडळींवर दु:खाचा डोंगर कोसळला.

- Advertisement -

सागच्या मृत्यूनंतर त्याच्या पश्चात त्याची पत्नी व दोन मुले, रुग्णायलात उपचार घेत असलेली वडिल असा परिवार आहे. सागरच्या पत्नी व दोन मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत. संपूर्ण कुटुंबावर कोरोनाने आघात केला. ही घटना मन पिळवटून टाकणारी आहे. गेल्या काही दिवसात वाडा तालुक्यात ६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ठाकरे कुटुंबियांच्या घटनेनंतर वाडा तालुक्यातही भितीचे वातावरण आहे.


हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: कोल्हापूरात लॉकडाऊनला हरताळ, पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -