घरCORONA UPDATEcoronavirus- Video अतिशहाण्या नागरिकांसाठी डॉक्टरांनीच पाठवला खास निरोप!

coronavirus- Video अतिशहाण्या नागरिकांसाठी डॉक्टरांनीच पाठवला खास निरोप!

Subscribe

या व्हीडिओत डॉक्टरने एका वेगळ्या पध्दतीने लोकांची शाळा घेतली आहे.

करोनाला भारतातून पळवायचं असेल तर भारतीयांना आधी शिस्त लागणं गरजेच आहे. भारतीयांना शिस्त लागावी यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू जाहीर केला. भारतीयांनी जनता कर्फ्यूला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. पण त्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या…जनता कर्फ्यू संपल्यानंतर जनता मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर उतरली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमावबंदीचे आदेश दिले. पण या जनतेने ते ही झुगारले आणि रस्त्यावर उतरले. सध्या सोशल मीडियावर एक हतबल झालेल्या डॉक्टरला व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

जनतेच्या सुरक्षेसाठी, करोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारने सर्व प्रयत्न केले. लोकांनी बाहेर पडू नये यासाठी लोकलही बंद केल्या. पण ही महराष्ट्राची जनता कोणाचचं ऐकेना. जगभरात हातपाय पसरलेल्या या करोनाने इटलीतर हाहाकार माजवला आहे. इटलीत दिवसाला ६००हून अधिक लोकांचे बळी जात आहेत. त्यामुळे इटलीतून नागरिकांनी खास भारतीयांसाठी व्हीडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकले. या व्हीडित इटलीतील नागरिकांनी केलेल्या चुका भारतीयांनी करू नका असे स्पष्ट म्हटले होते. मात्र तरीही याचा भारतीयांवर काहीही परिणाम झाला नाही.

- Advertisement -

महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स आणि अत्यावश्यक सेवा फक्त सुरू ठेवण्यात आल्या आहेत. केवळ नागरिकांच्या सुरक्षीततेसाठी मात्र त्याच गांभीर्य नागरिकांमध्ये नाहीये. शेवटी लोकांच्या वागण्याला कंटाळून एका डॉक्टरनेच व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काय म्हणाल्या डॉक्टर

या व्हीडिओत डॉक्टरने एका वेगळ्या पध्दतीने लोकांची शाळा घेतली आहे. लोकांचा डॉक्टरांवर विश्वास नाही. म्हणून डॉक्टरांच लोकं ऐकत नाही. पण हे सांगण्याची पध्दत डॉक्टरांची काही वेगळीच आहे. यात तीने लोकांनी बाहेर पडू नका, मास्क, सॅनिटाझरचा वापर करा. इटलीतील लोकांनी सांगितेलंल तरी ऐका, घरात बसू कंटाळा आला असेल तर अगदी पापड, लोणची करा असा सल्लाही दिला आहे. कारण लोकांनी सुरक्षीत राहणं महत्त्वाचं आहे. नाहीतर करोनाशी दोन हात करणं शक्यच नाहीये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -