घरCORONA UPDATEलॉकडाऊन : मद्यपी आणि नशेंडीची झाली पंचाईत

लॉकडाऊन : मद्यपी आणि नशेंडीची झाली पंचाईत

Subscribe

लॉकडाऊनमुळे नशेंडी, गुटखा सेवन करणारे, सिगारेट, बिडी पिणारे आणि मद्यपी यांच्या तीनतेरा वाजले आहेत.

कोरोनोमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे नाशपान करणारे आणि मद्यपी यांच्या तीनतेरा वाजल्या आहेत. दारूची विक्री करणारी दुकाने बंद म्हणून मद्य मिळेना तर अंमली पदार्थ घेऊन संचारबंदीत ग्राहकापर्यंत पोहचविणे हे धोक्याचे असल्याने वितरकांनी दडी मारलेली आहे. त्यामुळे नशेंडी, गुटखा सेवन करणारे, सिगारेट, बिडी पिणारे आणि मद्यपी यांच्या तीनतेरा वाजले आहेत. तल्फीची भूक भागविण्यासाठी आता दुधावरची तहान ताकावर भागवावी लागत आहे.
देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने आणि रस्त्यावर नागरिकांना फिरण्यास बंदी जिल्हाप्रशासन, राज्य सरकार यांनी केल्याने तसेच केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी दिल्याने पाच दिवसात सर्वसामान्य माणूस यांच्यासह मद्यपी आणि नशेंडीची पंचाईत झालेली आहे. या पाच दिवसात मद्याचा जवळ असलेला साठा किंवा मित्रमंडळीकडे असलेला मद्याचा साठा, सिगारेट, बिडी, गुटख्याच्या आणि अंमली पदार्थाचा साठा आता संपला. मात्र तो पुन्हा मिळण्याची शक्यता लॉकडाऊनमुळे दुरापास्त झालेली आहे. बाजारात  उपलब्ध असलेला साठा हा आतापर्यंत दुकानदारांनी चोरून चढ्या भावाने विकला. मात्र, लॉकडाऊन होऊन पाच दिवसात हा साठा संपला. वाहतूक आणि रस्त्यावर सर्वसामान्यांना महत्वाच्या  कामाशिवाय निघणे अनिवार्य केल्याने गुटख्याची वाहतूक झाली नाही. रस्त्यावरील नाकाबंदी नशेच्या सर्वगोष्टीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे चोरून विकणाऱ्या दुकानदारांनाही माल मिळत नसल्याने गुटखा खाणाऱ्याना आता तंबाखूवर आपल्या नशेच्या झिंग भागवावी  लागत आहे. दुसरीकडे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्याना ही लॉक डाऊन चा फटका बसला आहे. अमली पदार्थाचे तस्करी करून ग्राहकांपर्यंत पोचवणारे  वितारकच परागंदा  झाल्याने आता नशेडीं यांनाही कोरेक्स, किंवा नशेच्या गोळ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र तेही आता मिळणे कठीण झाले आहे. कारण  मेडिकल दुकानंतही साठा  आता निरधारीत असल्याने नशेंडीना दूध सोडाच पण ताक मिळणेही शक्य नसल्याचे चित्र आहे. यामुळे नशेंडी अस्वस्थ झालेले आहेत.
मद्यापीची तर तारांबळ उडाली आहे. पाच दिवस लॉकडाऊनमुळे मद्यापीची तीनतेरा वाजल्या आहेत. साठवलेला साठा संपला आता काळ्या बाजारात मद्य मिळते ब्रँडची नाही जे उपलब्ध  असेल ते पण तेही तिप्पट भावात यामुळे मद्यापीची अवस्था  बिकट आहे. आता या मद्यापीना नशामुक्त केंद्रात जाण्याची गरज नाही. तर लॉकडाऊनमुळे मद्यच मिळत नसल्याने नाईलाजास्तव या मद्यपींची दारू आपोआप  सोडविण्यास मोठी मदत होणार आहे. कारण ६०० रुपयांचा एक लिटरची मद्याची बाटली आता २५०० ते ३००० या दारात काळ्या बाजारात मिळत आहे. तीही चोरीचोरी…छुपके छुपके या अवस्थेत. त्यात माल घेऊन येण्याचे रिस्क अशा विविध कारणास्तव मद्यापीची कोंडी म्हणण्यापेक्षा टाळेबंदीच झाल्याचे चित्र आहे. इंग्लिश नाही तो देशी चलेगी, देशी नही  तो ताडी चलेगी, ताडी नही तो  गावठी चलेगी, अशी परिस्थिती  निर्माण झालेली आहे. समाजातील ठराविक वर्ग देशी दारूचे सेवन करणारा आहे. मात्र लॉकबंदीमुळे देशीदारू सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेली आहे. इंग्लिश पिणाऱ्यांनी ३० रुपयाची २५० मिली बाटली ३०० रुपयांना खरेदी काळ्या बाजारात करीत असताना ती मिळणेही कठीण झाले आहे. लॉकडाऊनमध्ये किमान दारूची दुकाने काहीवेळ सुरु ठेवायला हवी होती. कारण दारू पिऊन लोक घरात बसतील असा खुलासा मद्यपी चर्चे दरम्यान करीत आहेत.
लॉकडाऊन पूर्वीच अनेकांनी परिस्थितीचे भान ठेवीत चक्क मद्याचा आणि गुटख्याचा साठा होता. त्यात दुकानदारांनी काही काळ ठेवलेला साठा  माल मिळत नसल्याने चढ्या भावात काही दिवस विकला. त्यानंतर या साठा बहाद्दरांनी आपला साठा  तिप्पट आणि चौपट भावात विक्री केली आणि गब्बरगंड झाले ही वास्तविकता पाहायला मिळते. आता मात्र साठेबाजांचेच लॉकडाऊन झाल्याने एकच अस्थिरता पाहायला मिळाली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -