घरताज्या घडामोडीसध्याच्या लॉकडाऊनमुळे कोरोना चेन ब्रेक होणार नाही : भुजबळ

सध्याच्या लॉकडाऊनमुळे कोरोना चेन ब्रेक होणार नाही : भुजबळ

Subscribe

कडक निर्बंध लावण्याचा इशारा

कोरोना प्रभावित शहरांमध्ये नाशिक देशात अव्वल ठरले आहे हे नाकारून चालणार नाही. नाशिकची परिस्थिती गंभीर आहे हे मान्य करावे लागेल. रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे परंतु इतक्या मोठया प्रमाणात हॉस्पिटल, मनुष्यबळ आणि औषधे आणायचे कोठून ? असा सवाल उपस्थित करत कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जरी केला असला तरी, हा लॉकडाऊन काही कामाचा नाही. सरकारमधील अनेक मंत्री सध्याच्या लॉकडाऊनवर नाराज आहेत. या लॉकडाउनमुळे कोरोना चेन ब्रेक होणार नाही असे सांगत आता कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नाशिकमधील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. आज नाशिक येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

काय म्हणाले भुजबळ
– वेगाने कोरोना वाढणार्‍या शहरात देशात नाशिक नंबर एक वर
– मी ही माहिती नाकारत नाही
– राज्यातील सध्या सुरू असलेला लॉकडाऊन काही कामाचा नाही
– अजून कडक लॉकडाउन केला पाहिजे
– सरकार मधील मंत्रीच सध्याचा लॉकडाऊन वर नाराज
– या लॉकडाऊनमुळे कोरोना चेन ब्रेक होणार नाही
-अशीच परिस्थिती सुरू राहिली तर कितीही व्यवस्था केल्या तरी कमी पडणार
– मर्कज मुळे मागच्या वेळेस कोरोना वाढला म्हणून अनेकांवर गुन्हे दाखल केले
– आता परिस्थिती बिकट असताना देखील कुंभमेळा का घेतला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -