घरCORONA UPDATELockdown - कोरोनाने बदलले शाळेच्या सुट्टीचे संदर्भ, शाळा बंद, अभ्यास सुरू!

Lockdown – कोरोनाने बदलले शाळेच्या सुट्टीचे संदर्भ, शाळा बंद, अभ्यास सुरू!

Subscribe

सुटीच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.

शाळा बंद म्हटले की धम्माल मस्ती हे मुलांचे समीकरण ठरलेले आहे. परंतु ऐन परीक्षेपूर्वी कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद कराव्या लागल्या होत्या. तसेच एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या केंद्रीय शाळाही बंदच राहिल्याने आता अनेक शाळांनी घरबसल्या पुढील वर्गाचा अभ्यास सुरू केला आहे. पुढच्या इयत्तांचा अभ्यासक्रम समाजमाध्यमांचा वापर करत शिकवला जात आहे. त्याचबरोबर सीईटी आणि इतर स्पर्धा परीक्षाचांही सराव सुरु आहे. शाळा बंद पण शिक्षण सुरु आहे असे चित्र आता घराघरात दिसत आहे.

कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून राज्यातील शाळांना सुटी आहे. या सुटीच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. शिक्षक आणि पालक समन्वय साधून व्हॉटसअॅप, फेसबुकच्या माध्यमातून विद्यार्थ्याना अभ्यासाचे धडे गिरवण्यास लावत आहेत.

- Advertisement -

पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनेही पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासमाला आणली. दीक्षा मोबाईल अॅपच्या माध्यमातून पाठ- वाचनपाठ आणले. पालकांच्या मोबाईलमध्ये लिंक देत विषयनिहाय पाठनिहाय लिंकना टच करून तो पाठ पहायचा किंवा स्वाध्याय सोडवायच्या अशा सूचना दिल्या आहेत. सीबीएसईचे शैक्षणिक वर्ष एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाले आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी ऑनलाइन अभ्यासाला सुरुवात केली आहे. पालकांचे वर्गनिहाय ग्रुप तयार केले असून यामध्ये वर्गशिक्षक, मुख्याध्यापकांचाही समावेश केला आहे. शिक्षक दररोज अभ्यास देत त्याची उजळणी तसेच वैयक्तीक फोटो घेत तपासणी करत आहेत.

आम्हाला झूम अॅपच्या माध्यमातून विज्ञानाचे धडे शिकवायला सुरूवात केली आहे. सुट्टीत घरी बसून कंटाळेलेलो असताना सरांच्या ह्या मोबाईल वर्गांमुळे अभ्यासाचा आनंद लुटता येतोय. – प्राजक्ता सोनावणे, विद्यार्थीनी


हे ही वाचा – ‘शंकराला दूध पाजा, कोरोना घालवा’ लोकांच्या लागल्या रांगा!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -