Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सिंधुदुर्गात जिल्ह्यात कोरोनास्थिती नियंत्रणात

सिंधुदुर्गात जिल्ह्यात कोरोनास्थिती नियंत्रणात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

Related Story

- Advertisement -

राज्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, जिल्ह्यातील जनतेने गाफील न राहता योग्य ती काळजी घ्यावी असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरण मोहिमेबाबतच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले की, सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.5 असून, तर मृत्यू दर 2.7 टक्के इतका आहे. आतापर्यंत सुमारे 65 हजार 839 इतक्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठी उपलब्ध असून, आगामी 10 दिवसात आरोग्य विभागाने किमान 5 हजार कोरोना टेस्ट कराव्यात. तसेच स्वॅब टेस्ट प्रलंबित राहू नयेत याची दक्षता घ्यावी, असे सांगून सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना मुक्तीसाठी अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. जिल्ह्यात सुमारे 93 टक्के पोलिसांचे लसीकरण झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली. तर जिल्ह्यात एकूण 10 हजार 285 लोकांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली. या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री उदय सांमत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन ज्या व्यापाऱ्यांना अथवा उद्योजकांना वीजबिल भरण्यासंदर्भात हप्ते पाडून दिले गेले असतील आणि अशांनी वीजेचा पहिला हप्ता भरला असेल अशांचे वीज तोडणी करु नये. त्याचबरोबर महावितरणने वीजबिलाची योग्य ती शहानिशा करावी, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.

यावेळी आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जि.प. अध्यक्षा श्रीमती समिधा नाईक, जि.प. आरोग्य सभापती सावी लोके, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अपर्णा गावकर, जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे, महावितरणचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील आदीं उपस्थित होते.


हेही वाचा- सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कुणकेश्वर यात्रा रद्द

- Advertisement -

 

- Advertisement -