घरताज्या घडामोडीरायगडमध्ये आढळले ६३ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा दीड हजार पार

रायगडमध्ये आढळले ६३ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा दीड हजार पार

Subscribe

रायगड जिल्ह्यातही कोरोनाची व्याप्ती वाढली आहे. गेल्या २४ तासांत रायगडमध्ये ६३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर रायगड जिल्ह्यातही कोरोनाची व्याप्ती वाढली आहे. गेल्या २४ तासांत रायगडमध्ये ६३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ८५३ वर पोहोचला आहे. तर ५६ जणांनी कोरोनावर मात केली असून दिवसभरात उपचारा दरम्यान चौघांचा मृत्यू झाला आहे.

५६ जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात ६३ नव्या करोनाबाधितांची भर पडली असून यामध्ये पनवेल मनपा हद्दीतील ४४, पनवेल ग्रामीण मधील ७, उरणमधील १, पेण ६, अलिबाग ३, माणगावमधील २ रुग्णांचा समावेश आहे. तर दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील ३, कर्जतमधील एका रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ५६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
रायगड जिल्ह्यातील ५ हजार ५५४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील ३ हजार ६१९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर १ हजार ८५३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ८२ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून १ हजार ३४५ जणांनी करोनावर मात केली आहे.

- Advertisement -

कोरोनाबाधित रुग्ण

जिल्ह्यात सध्या ४२६ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील २६२, पनवेल ग्रामीण हद्दीतील ७१, उरणमधील १५, खालापूर ३, कर्जत १५, पेण १३, अलिबाग १३, मुरुड ४, माणगाव ७, रोहा १, म्हसळा ११, महाड ११ करोना बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ८२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ४२ हजार ११२ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.


हेही वाचा – धक्कादायक! व्यावसायिकाने दिली स्वत:च्याच हत्येची सुपारी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -