घरमहाराष्ट्रCovid Pandemic: आषाढी वारी आणि गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचं सावट?

Covid Pandemic: आषाढी वारी आणि गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचं सावट?

Subscribe

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोना महामारीचं संकट आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आता दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून सर्वच सण-उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सजग नागरिकांनी प्रशासनाचे आवाहन पाळत आणि कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता गेल्या वर्षभरात सर्वच सण-उत्सव आपल्या घरातच आणि साधेपणाने साजरे केलेत. मात्र यंदा देखील सर्वांचा लाडका गणेशोत्सव आणि आषाढी वारीवर कोरोनाचं सावट असल्याचे चित्र दिसतंय.

यंदा कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे आषाढी वारीसह गणेशोत्सवावर अनिश्चिततेचं सावट असल्याने या वर्षीही कोरोनाच्या नियमांसह प्रशासनाने घातलेल्या नियमांचे पालन करत सण उत्सव साजरे करावे लागण्याची शक्यता आहे. आषाढातली पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे. कोरोनाचे संकटामुळे गेले संपूर्ण वर्ष वारकरी संप्रदायासाठी काळे वर्ष ठरले होते. गेल्या वर्षी चैत्री वारी, सर्वात मोठी असलेली आषाढी यात्रा त्यानंतर ३ वर्षातून येणार अधिक मास आणि कार्तिकी यात्रा हे सर्व सोहळे कोरोनामुळे रद्द झाले होते. मात्र यंदाच्या वर्षात सालात वारकरी संप्रदायाची येणारी पहिली वारी पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडली आहे.

- Advertisement -

आषाढी वारी सोहळ्याचा अंतिम निर्णय ३० मेनंतर

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. यावेळी त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाऊनचे स्वरूप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पायी वारी, पालखी सोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले. दरम्यान, राज्यातली कोव्हिड रुग्णांची वाढती संख्या लक्षात मोठ्या कार्यक्रमांसह उत्सवावरील आयोजनावरचे निर्बंध आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यंदा गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी कोरोना वाढत असल्याने गणेशोत्सवावर अनिश्चितेचे सावट निर्माण झाले होते. मात्र यंदा देखील कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव यंदाच्या गणेशोत्सवापर्यंत असाच राहिला तर गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मूर्तीची उंची कमी करण्यात आली होती. यासोबतच गणेश मंडळांना नियमांचे काटेकोर पालनही करावे लागले होते. गणेश भक्तांना मंडपात जाऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच गणपतीची आरती, आगमन, विसर्जन या सोहळ्यांना केवळ १० कार्यकर्त्यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर यंदा देखील गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -