घरदेश-विदेशराज्यातील करोना मृतांचा आकडा ७२

राज्यातील करोना मृतांचा आकडा ७२

Subscribe

मुंबई ४५। ठाणे जिल्हा ११। पुणे १०

राज्यात आतापर्यंत ११७ करोनाबाधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले असताना बुधवारी एक दिवसात राज्यात ११७ करोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. त्यातील १०६ रुग्ण एकट्या मुंबईतील आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ११३५ झाली आहे. मात्र राज्यातील करोना रुग्णांच्या मृतांचा आकडा ७२ वर गेला असून त्यापैकी ४५ जण मुंबईतील आहेत. बुधवारी राज्यात आठ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्युंपैकी मुंबईत ५, पुण्यात २ तर कल्याण-डोंबिवलीमधील एका रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २७,०९० नमुन्यांपैकी २५,७५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ११३५. जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ११७ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३४,९०४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४४४४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

- Advertisement -

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी २५ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, बुलढाणा जिल्ह्यात ६ आणि प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव आणि वाशीम मधील आहे.

मृतांची माहिती

=काल सकाळी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात धारावी येथील एका ६४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फुप्फुसाचा विकार होता.

- Advertisement -

=काल संध्याकाळी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात एका ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला मधुमेह होता.

= काल दुपारी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात एका ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

=दिनांक ६ एप्रिल रोजी रात्री कस्तुरबा रुग्णालयात कोविड १९ बाधित रुग्णाची सहवासित असणार्‍या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला अस्थमा आणि फुप्फुसाचा जुनाट विकार होता.

=मुंबईच्या के ई एम रुग्णालयात ५९ वर्षीय महिलेचा कोविड१९ मुळे मृत्यू झाला.

=आज पहाटे पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये ४४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह होता. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.

=पुण्याच्या ५५ वर्षीय पुरुषाचा ससून रुग्णालयात काल कोविड १९ मृत्यू झाला.

=कल्याण डोंबिवली येथील ५५ वर्षीय स्त्रीचा बाबू जगजीवनराम रुग्णालय, मुंबई येथे ६ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यांना फुप्फुसाचा जुनाट विकार होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -