घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटआज वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा ड्राय रन

आज वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा ड्राय रन

Subscribe

कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबविताना येणारे अडधळे शोधण्यासाठी आणि पुढील काळात त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येणार आहे.

कोरोनाच्या लसीसाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच कोरोना लसीकरण केले जाणार आहे. आज वाशिममध्ये कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात येणार आहे. कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबविताना येणारे अडधळे शोधण्यासाठी आणि पुढील काळात त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येणार आहे. यापूर्वी नागपूर आणि इतर काही जिल्ह्यात ड्राय रन घेण्यात आला. आज वाशिम जिल्ह्यात ड्राय रन घेण्यात येणार आहे.

कोरोना लसीकरणाबाबत संपूर्ण नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे सर्व बाबींची पडताळणी करणे या गोष्टी कोरोना लसीकरणाच्या ड्राय रन मध्ये केल्या जाणार आहेत.
त्याचप्रमाणे क्षेत्रीय स्तरावर कोविन App किती सोयीस्कर आणि उपयोगी आहे हे तपासणे, लसीकरणात येणारी आव्हाने आणि त्यानुसार मार्गदर्शक सुचना करणे या गोष्टी ही ड्राय रनमध्ये केल्या जाणार आहेत. लसीकरण मोहिमेत सर्व स्तरांवरील अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे मुख्य आणि महत्त्वाचे कामही या ड्राय रनमध्ये केले जाणार आहे.

- Advertisement -

ड्राय रनमध्ये सत्रस्थळावर चाचणी लाभार्थांचे निरिक्षण केले जाणार आहे. एका केंद्रावर जवळपास २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार आहे. कोविन App वर केलेल्या नोंदणीनुसार लाभार्थ्यांना कक्षात सोडण्यात येणार आहे. कोविन App मधून लाभार्थ्यांची माहिती पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहिती नोंद कोविन App मध्ये केली जाणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर ड्राय रन म्हणजे कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम केली जाणार आहे.


हेही वाचा – कोविशील्डच्या दोन डोसांमध्ये तीन महिन्यांचे अंतर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -