घरताज्या घडामोडीCorona Crisis: कोरोनामुळे १२ हजार ऑर्केस्ट्रा कलाकारांवर उपासमारीची वेळ

Corona Crisis: कोरोनामुळे १२ हजार ऑर्केस्ट्रा कलाकारांवर उपासमारीची वेळ

Subscribe

कोरोनामुळे ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनमधील १२ हजार कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बऱ्याच जणांचे हातावर पोट आहे, अशांना या कोरोनाचा फटका बसला आहे. दरम्यान, या काळात मालिका, सांस्कृतिक कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत, त्यामुळे याचा फटला आता कलाकारांना देखील बसला आहे. या काळात कोणतेच कार्यक्रम होऊ शकत नसल्याने ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनमधील १२ हजार कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांनी आता सरकारकडून आर्थिक सहायता निधीची विनंती करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनमधील १२०० कलाकारांवर उपासमारीची वेळ

ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनमधील १२०० कलाकारांवर उपासमारीची वेळ, सरकारकडे आर्थिक सहायता निधीची विनंती – देवयानी मोहोड, वादक कलाकार

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಮಾರ್ಚ್ 31, 2020

- Advertisement -

ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनमध्ये मराठी, हिंदी वाद्यवृंदात १२ हजारांपेक्षा अधिक कलाकार आहेत. यामध्ये गायक – गायिका, वादक, निवेदक, नर्तक, कव्वाल, लोकशाहीर, गोंधळी, मिमिक्री आर्टीस्ट, लाईट – साऊंट तंत्रज्ञ आणि निर्माते, बॅकस्टेज कामगार आपली कला पेश करुन आपले आणि आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात. तसेच ते शासकीय कार्यक्रम, पोलीस वेल्फेअर, सिनेमा अशा विविध कार्यक्रमात आपली कला सादर करतात. मात्र, ‘सध्या लॉकडाऊमुळे ही कला सादर करणे शक्य नाही. कारण आमची कला ही घरात बसून आपल्या आदेशाप्रमाणे सादर करता न येणारी कला असून जेव्हा आम्ही आमची प्रत्यक्ष कला ज्याठिकाणी सादर करतो, त्याचवेळी आम्हाला आमचे मानदन मिळते. त्यावरचे आमच्या कुटुंबाची गुजराण होत असते’.

तसेच ‘लॉकडाऊनची तारीख ओलांडल्यानंतर देखील जून – जुलै २०२० पर्यंतचे बहुतेक सर्वच कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे आमच्या भवितव्याबाबत आमच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह आहे. त्यातच जून ते सप्टेंबर हा पावसाळा ऋतू असल्याने त्या दरम्यान आमचे कार्यक्रम निश्चित नसतात. त्यामुळे आम्ही काय खायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्हा कलाकारांना आर्थिक सहाय्य मिळण्याकरिता सहकार्य करावे’, अशी मागणी या कलाकारांनी पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! अनेकांना ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’द्वारे कोरोना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -